नागपूरः दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध सार्वजनिक आयोजनांवर ब्रेक लागला होत. मात्र यंदा निर्बंधमुक्त असल्याने शहरातील विविध भागात विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्यावतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण - पश्चिम विधानसभातर्फे सोनेगाव परिसरातील सहकार नगर गजानन महाराज मंदिरा जवळ असलेल्या मैदानात दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या दहीहंडीत नागपुरातील सहा बलाढ्य गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदविला, भंडारा जिल्ह्यातील एक गोविंदा पथक तसेच दोन महिला गोविंदा पथकांचे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच 75 हजारांचे प्रथम पुरस्काराचा मान नागपुरातील जय भोलेश्वर गोविंदा पथकाने मिळवला. यावेळी पोलिसआयुक्त अमितेश कुमार, एबीपी नेटवर्कच्या विदर्भ संपादक सरीता कौशिक, माजी रणजी क्रिकेटपटू हेमंत वसू, मनोहर अगस्ती, डॉ. अनुप मरार, ज्येष्ठ नागरिक वसंत पाटील आदी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष अजय ढोके, तुषार गिऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित या कार्यक्रमात सहभागी गोविंदा पथके आणि उपस्थित नागरिकांची मनसे दक्षता समितीतर्फे काळजी घेण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून आयोजन केल्याबद्दल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. ढोलताशांच्या व डिजेच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी यामुळे उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले होते. कार्यक्रमाचे संचालन पूनम खंडवानी यांनी केले. चौथ्या फेरीत सहा थरांवर असलेल्या दहीहंडीला फोडण्यात यश मिळविले. या विजयाचा मान नागपुरातील जय भोलेश्वर गोविंदा पथकाने मिळविला.
मनसेतर्फे प्रथम पारितोषिक 75,000 रुपये व मानचिन्ह तसेच प्रत्येक सहभागी चमूला 5000 रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक व मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष सहकार्य दिल्याबद्दल सोनेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांचे मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी आभार मानले. आयोजनासाठी तुषार गिऱ्हे, चेतन शिराळकर, चेतन बोरकुटे, शिरीष पटवर्धन, हर्षद दसरे, राजू पोलाखरे, विपीन धोटे, देवेंद्र ठाकरे, जमशेद अन्सारी, रोशन इंगळे, गणेश मुदलीयार, प्रसन्ना पटवर्धन ,मिलिंद जोशी, संजय करमचदाणी यांनी परीश्रम घेतले.
इतर बातम्या