नागपूरः भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणाऱ्या टी- 20 सामन्यासाटी नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तब्बल तीन वर्षांच्या दिर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना बघण्यासाठी नागपूरच नव्हे तर विदर्भातील क्रिकेट प्रेमी आणि मध्य प्रदेश, छत्तीसगढ येथील क्रिकेट प्रेमींनी तिकिट (India vs Australia) मिळविण्यासाठी योजना आखळी. मात्र रविवारी सुरु झालेली ऑनलाइन तिकिट विक्री (Online match tickets) अवघ्या काही मिनिटांतच सर्व तिकिटे 'सोल्ड आऊट' झाली. तिकिटे न मिळाल्याने दिवसभर अनेकांनी सोशल माध्यमांवर दिवसभर संताप मांडत खदखद व्यक्त केली.
पोलिसांकडून व्हावी चौकशी
दुसरीकडे तिकीटे सोल्ड आऊट (sold out) होताच सोशल मीडियावर तिकीट उपलब्ध असून संपर्क साधा असे मॅसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली. यामध्ये अव्वाच्या सव्वा दरात तिकीटांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच 500 रुपयांच्या तिकीटांपासून तर महागडे तिकीटही या ब्लॅकमध्ये विक्री (Black sale of match tickets) करणाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असल्याने तिकीट विक्रीची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
काही जुगाड आहे का?
क्रिकेटप्रेमी नागपुरात (Cricket lovers) राहणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांना फोन करुन तिकीटांचा जुगाड आहे का ? अशी विचारणा करु लागले आहेत. 2019 नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय (International Match) सामना होत असल्याने क्रिकेट चाहत्यांसोबतच सामन्य जनतेमध्ये देखील या सामन्याची आतुरता आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास तिकीट विक्रीला सुरुवात झाली. एका खासगी अॅपमध्ये माध्यमातून ही विक्री करण्यात आली. मात्र अवघ्या अडीच ते तिन मिनिटांच्या कालावधीत ही सर्व तिकीटे विकल्या गेली. इतका प्रयत्न करुनदेखील तिकीट न मिळाल्याने बहुतांश जणांचा भ्रमनिसार झाला.
...अन् पाऊसच आला पाहीजे
- ऑनलाइन तिकीट विक्री सुरु होण्यापूर्वीच अनेक जण लॉगिन (Login) करुन बसले होते. मात्र काही मिनिटांतच सर्व तिकीट सोल्ड झाल्याने सोशल मीडियावर दिवसभर भन्नाट प्रतिक्रीया बघण्यास मिळाल्या.
- एका युजरने, यात देव करो अन् पाऊसच आला पाहीजे अशी पोस्ट तिकीट न मिळालेल्यांनी केलीय
- दुसऱ्या युजरने, शहरात सध्या दोनच प्रकारचे लोकं असून एक म्हणजे तिकीट घेऊन मॅच पाहण्यासाठी जाणारे आणि दुसरे म्हणजे पाऊस आला पाहीजे म्हणून देवाकडे प्रार्थना करणारे.
- तर एका नागपूरकराने तर 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवस असल्याने 75 रुपयात चित्रपट पाहणार असल्याचा सल्ला तिकीट न मिळालेल्यांना दिला.
- तर तिकीट देणाऱ्या प्रणालीवर एकाने संताप व्यक्त करत एका लॉगिनवर एक तिकीट देणार असल्यावर टीका करत नवरा आणि बायको वेगवेगळे मॅच बघण्यास जातील का असा सवाल उपस्थित केला.
- तर एका तिकीट मिळवलेल्या युजरने मी मॅच बघायला एकटा जाऊ की ट्विटरवर माझ्यासाठी मॅच शोधू असा मिश्किल प्रतिक्रीया दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या