नागपूरः विदर्भातील खऱ्या प्रश्नांना बदल देत काही राजकीय पक्षांकडून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर वेळोवेळी राजकारण करण्यात येते. मात्र विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा आहे का? एकदा जनतेला हा प्रश्न विचारावा त्यानंतर निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट प्रतिक्रीया राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


अनेक राजकीय पक्षांकडून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर जनतेला भ्रमित करण्यात येते. खरच वेगळ्या विदर्भाची गरज आहे की, इतर महत्त्वाचे मुद्दे राज्यासमोर आहे याचा विचार करण्याची गरज असल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले. तसेच विदर्भ आमच्यासाठी महाराष्ट्राचा एक भाग असल्याचे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वेगळ्या विदर्भाबाबतची भूमिकाही चिन्हीत केली.


उद्धव ठाकरे सरकारचं मनसेनं कधीच कौतुक केलं नाही


उद्धव ठाकरे (raj thackeray on uddhav thackeray) यांच्या नेतृत्वात असलेल्या राज्यातील सरकारची स्तुती किंवा कौतूक मनसेने कधीच केले नाही. मात्र तरी काही वृत्तपत्र आणि माध्यमांद्वारे खोट्या बातम्या पेरण्यात येतात. ही माहिती आपण कुठून आणली. कोणी सांगितली हे तरी वाचकांना सांगा. आम्ही कधीच उद्धव ठाकरे सरकारचे कधीही कौतूक केले नसल्याची स्पष्टोक्ति राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्रात छापलेल्या वृत्ताचे खंडन करताना केले. तसेच लोकांमध्ये संभ्रम पसरवू नका असा टोलाही लागावला.


राज ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतूक


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे व्हिजन खूप भव्य आहे. म्हणजे ते छोट्या गोष्टींची कल्पनाच करत नाही. त्यांचे जे काही विचार असतात ते ऐकतांना स्वप्नच वाटतात. मात्र सत्यात उतरल्यावर त्यावर विश्वास होतो. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नितीन गडकरींचे कौतूक केले. तसेच नितीन गडकरी आणि माझे संबंध वैयक्तिक आहे. त्यामुळे त्यांच्या आणि माझ्या भेटीचे वेगळे अर्थ लावून घेऊ नका असे स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिले. रविवारी सायंकाळी राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. तसेच नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या फुटाळा (Futala) येथील कारंज्याचे (musical fountain futala) कौतूकही केले.


सोमवारी बावनकुळे यांची भेट


विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी सोमवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेतली. तसेच ही भेटही वैयक्तीक असल्याचे सांगून राजकीय चर्चा होणार नसल्याची प्रतिक्रीया दिली. मात्र गेल्या काही दिवसात भाजपच्या नेत्यांसोबतच्या (BJP leaders) वाढलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीगाठी मुळे महाराष्ट्रातील राजकारणाचे (Maharashtra Politics) समिकरण बदलणार असल्याची चर्चा आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Raj Thackeray: राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी; राज ठाकरेंचा हल्लाबोल


राज ठाकरेंकडून नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त, लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार