नागपूरः राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीत तीन वार्डचा एक प्रभाग, चार वार्डचा एक प्रभाग ही पद्धतच चुकीची आहे. यामुळे नागरिकांना आपल्या नागरी समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांकडे चकरा माराव्या लागतात. एकदा निवडूण आले की नगरसेवकही गब्बर बनतात. ही पद्धत बंदच केली पाहीजे, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणूकीतील प्रभाग पद्धतीवर केली. नागपुरातील रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


पुढे राज ठाकरे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रकारे एक वार्ड एक प्रभाग पद्धतीनुसार निवडणूकात होतात. त्याचप्रमाणे राज्यातही व्हाव्या मात्र काही मोजक्या मोठ्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी ही प्रभाग पद्धत अमलांत आणण्यात आली आहे. एखाद्या परिसरात प्रभाव असलेला चांगला कार्यकर्ता या प्रभाग पद्धतीमुळे निवडणून येऊ शकत नाही. चार वार्डांच्या प्रभागात सामान्य उमेदवार हा टीकू शकत नाही. फक्त मोठे राजकीय पक्ष आणि धनाढ्या उमेदवारच टीकू शकतो असेही यावेळी ठाकरे म्हणाले.


भाजप विरुद्ध लढणार


नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. निवडणूकीत मोठं होण्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध लढणे गरजेचे असते. प्रत्येक शहराच्या समस्या वेगळ्या असतात. त्याचा अभ्यास करुनच त्याचे व्हिजन तयार करता येते. त्या व्हिजनवरुनच तुम्हाला जनता मतदान करीत असते. त्यामुळे आम्ही चांगले उमेदवार देऊ. नागपुरात आम्ही भाजपविरुद्ध लढू तसेच आमचे उमेदवार निवडूनही येतील असा दावा यावेळी राज ठाकरे यांनी केला.


प्रभाग पद्धत लोकशाहीसाठी घातक


प्रभाग पद्धतीमुळे एकीकडे फक्त मोठे पक्ष विजयी होतात आणि खरा समाजसेवक मागे राहून जातो. यासोबतच चार वार्डांचा प्रभाग असल्यास वेग-वेगळ्या पक्षाचे दोन-दोन उमेदवार निवडूण आले तर एकमेकांचे पाय ओढण्याचे काम करतात. त्यामुळे प्रभागाचा विकास होत नसल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले. एका प्रभागात चार नगरसेवक असले तर समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांनाही माझ्याकडे नाही त्याच्याकडे जा अशी टाळाटाळ करण्यात येते. त्यामुळे ही पद्धतच कायमची बंद व्हावी अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.


उद्धव ठाकरेंनी मतदारांची प्रतारणा केली


लोकशाहीत आतापर्यंत मतदारांची इतकी प्रतारणा कोणीही केली नव्हती, पण तुम्ही युती-आघाड्या करुन निवडणूका लढवता, लोकं तासनतास रांगेत राहून मतदान करतात. लोकासमोर एक गोष्ट सांगता, तुमचं ऐकून लोक तुम्हाला मतदान करत असता. पण निकाल लागल्यावर कोणीतरी सकाळचा शपथविधी करतो. लोकांनी या सगळ्यांचा हा खेळ बघत राहायचे का. त्या मतांचा हा अपमान आहे. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. आज नागपूरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. 1989 सालची गोष्ट असेल, शिवसेना-भाजप युतीच्या सुरवातीला, मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन होतो असे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि भाजपचे प्रमुख नेते यांनी ठरवलं होतं की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Sanjay Raut Custody : संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, कोठडी 14 दिवसांनी वाढली


राज ठाकरेंकडून नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त, लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार