एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात नियम धाब्यावर बसवून डान्सबार सुरु, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

डान्स बारमध्ये डान्स करणाऱ्या महिला डान्सर्ससोबत अश्लील वर्तन सुरु असल्याचंही समोर आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात "बारबीलो" या बारमध्ये नियमबाह्य पद्धतीने डान्स बार सुरु असल्याचे समोर आलं आहे.

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात डान्स बारला परवानगी नसताना काही ठिकाणी राजरोसपणे डान्स बार सुरु असल्याचं समोर आलं आहे.

डान्स बारमध्ये डान्स करणाऱ्या महिला डान्सर्ससोबत अश्लील वर्तन सुरु असल्याचंही समोर आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात "बारबीलो" या बारमध्ये नियमबाह्य पद्धतीने डान्स बार सुरु असल्याचे समोर आलं आहे. या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून महिला डान्सर्सवर नोटा उधळल्या जात आहेत. हा सगळा प्रकार बारमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

बारबीलो बारचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. बारच्या आत काही लोक बेभान होऊन डान्स करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बोलावलेल्या महिलांवर हे सर्व लोक नोटा उधळतान दिसत आहे. यापैकी काही जण या महिला डान्सर्सकवर बळजबरी करण्याच्या प्रयत्न करतानाही दिसत आहेत.

नागपूर जिल्ह्यात एकाही बारला डान्स बार श्रेणीची परवानगी नाही. फक्त ऑर्केस्ट्रा म्हणजेच गाण्याच्या कार्यक्रमाची परवानगी आहे. नियमानुसार डान्स आणि बारची जागा वेगवेगळी असावी. एक लोखंडी कडा बनवून त्याच्या बंदिस्त क्षेत्राच्या आत महिला गायकाला ठेऊन कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

मात्र, ग्रामीण भागात अनेक बारमध्ये हे सर्व नियम धाब्यावर बसवून कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे समोर आलं आहे. बुटीबोरी परिसरातील या सीसीटीव्ही फुटेजमुळे तर असे बार महिलांवर अत्याचार करण्याचे ठिकाण बनत चालल्याचे, अश्लीलता पसरविणारे अड्डे बनल्याचे समोर आलं आहे. आता खुद्द नागपूरचे पालकमंत्री असलेले आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे अशा बारविरोधात काय कारवाई करतात, हे पाहवं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Parinay Fuke : नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त
नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त
Mahajyoti-Vanarti Exams : पुण्यासह नांदेडच्या परीक्षा केंद्रावर पुन्हा परीक्षा होणार, महाज्योती अन् वनार्टी संस्थेमार्फत स्पष्टीकरण; अहवालानंतर दोषींवर कारवाईचाही शब्द
पुण्यासह नांदेडच्या परीक्षा केंद्रावर पुन्हा परीक्षा होणार, महाज्योती अन् वनार्टी संस्थेमार्फत स्पष्टीकरण; अहवालानंतर दोषींवर कारवाईचाही शब्द

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Embed widget