एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुंडांची वाढती दहशत, खंडणीसाठी वृद्धाची हत्या

सध्या निवडणुकांमुळे नागपुरात गुंडांविरोधात धडक कारवाई सुरु केल्याचा दावा नागपूर पोलीस करत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अनेक मोकाट गुंड खंडणी वसुली आणि फुकटेगिरी करण्यासाठी गरीबांचे जगणे कठीण करत आहेत.

नागपूर : नागपुरात गुंडांची दहशत खूपच वाढली आहे. अनेक गुंड खंडणी मागून त्यासाठी मारहाण करुन सामन्य नागरिकांना त्रास देत आहेत. जबरदस्तीने लोकांकडून पैसे लुबाडत आहेत. परंतु नागपुरातलं पोलीस प्रशासन मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही पैशांसाठी नागपुरातल्या एका गुंडाने एका वृद्धाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रामचंद्र निखारे (65) यांचे नागपुरातल्या कुंजीलालपेठ परिसरात फुलांचे लहानसे दुकान आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून ते त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. निखारे यांची दोन्ही मुलं त्यांना या कामात मदत करत होती. परंतु परिसरातील गुंड विक्की खोंडे आणि त्याचा मित्र सौरभ हे दोघे नेहमीच रामचंद्र यांच्या दुकानात येऊन त्यांना धमकावून पैसे घ्यायचे. पैसे देण्यास विरोध केल्यास चाकूचा धाक दाखवायचे. रामचंद्र यांचा मोठा मुलगा रोशन शनिवारी दुकानाजवळच्या परिसरात फुलांच्या हारांची डिलिव्हरी देण्यासाठी सायकलने जात होता. तेव्हा गुंड विक्की खोंडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रोशनला अडवत त्याला मारहाण केली आणि रोशनजवळचे सर्व पैसे काढून घेतले. त्यानंतर जखमी रोशनने कुटुंबियांच्या मदतीने अजनी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार केली. परंतु पोलिसांनी तक्रार न नोंदवता गुंड पुन्हा दिसल्यास आम्हाला कळवा असे सांगून एक मोबाइल नंबर दिला. संध्याकाळी गुंड विक्कीला निखारे कुटुंबियांनी आपल्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. संतापलेल्या गुंडाने सहकाऱ्यांच्या मदतीने निखारे कुटुंबाचे घर गाठले आणि रोशनला मारहाण सुरू केली. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई-वडील मध्ये पडले. त्यावेळी गुंडाने वृद्ध रामचंद्र यांना जिन्यावरून जोरदार धक्का दिला. रामचंद्र खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी वेळीच म्हणजेच दुपारी आमच्या तक्रारीनंतर योग्य कारवाई करत गुंड विक्कीला जेरबंद केले असते तर आमचे वडील आज जिवंत असते, असे पीडित कुटुंबियांचे म्हणणे आहे. एबीपी माझाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी दुपारी निखारे कुटुंबीयांनी तक्रार दिली होती. त्याप्रमाणे एक पोलीस शिपाई गुंडांच्या शोधासाठी पाठवला होता. परंतु तो आम्हाला सापडला नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. तसेच रामचंद्र यांच्या मृत्यूनंतर गुंड विक्की खोंडे आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या निवडणुकांमुळे नागपुरात गुंडांविरोधात धडक कारवाई सुरु केल्याचा दावा नागपूर पोलीस करत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला विक्की खोंडे सारखे मोकाट गुंड खंडणी वसुली आणि फुकटेगिरी करण्यासाठी रामचंद्र यांच्यासारख्या हजारो गरीबांचे जगणे कठीण करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Devendra Fadnavis Gen Z Nagpur : नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात?, देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात?, देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nagpur Accident: ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत
ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget