कांबळे दुहेरी हत्याकांड
1) फेब्रुवारी 18 - कांबळे दुहेरी हत्याकांडाने नागपुरात तणाव निर्णाण झाला होता. पत्रकार रविकांत कांबळे यांची 55 वर्षाची आई उषा आणि 2 वर्षाची मुलगी राशी या दोघांची एका दुकानदाराने भिशीच्या पैशावरून केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खटल्यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक केली.


माओवादावर मोठी कारवाई
2) जून 6 - शहरी माओवादावर पहिली मोठी कारवाई झाली. भीमा कोरेगाव दंगलीची पार्श्वभूमीवर देशभरातील अटकसत्रात नागपुरातील माओवाद्यांचा वकील सुरेंद्र गडलिंग, प्राध्यापिका सोमा सेन आणि कार्यकर्ता महेश राऊत यांना अटक केली. या तपासातून देशभर अनेक धागेदोरे सापडले.

प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर
3) जून 7 - संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाचे मुख्य अतिथी म्हणून देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आमंत्रण देण्यात आले होते. हे आमंत्रण मुखर्जींनी स्वीकारले. मात्र त्यानंतर काँग्रेस पक्ष ढवळून निघाला. संघ परिवाराचा य विजयाने प्रणवदा काँग्रेस आणि त्यांच्या मुलीपासून राजकीयदृष्ट्या दुरावले.

एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या
4 ) जून 11 - नागपूरच्या आराधना नगरात कमलाकर पवनकर यांचा मेहुणा विवेक पालटकर याने पनवकर आणि त्यांची पत्नी, मुलगी, आई आणि भाचा अशा 5 जणांची हत्या केली. महिनाभर बेपत्ता असलेल्या पालटकरला पोलिसांनी पंजाबमधून अटक केली. अंधश्रद्धा आणि शेतीचा वाद अशी दोन कारणे समोर आली असून मृत पावनकर कुटुंबाच्या मुलीचा नातेवाईक सांभाळ करत आहेत. परंतु आरोपी पालटकरच्या मुलीला सांभाळण्यास कोणताही नातेवाईक तयार न झाल्याने तिला रिमांड होममध्ये जावे लागले ही शोकांतिका.

धार्मिक स्थळांवर कारवाई
5) मंदिर आणि इतर धार्मिक स्थानांचे अतिक्रमण तोडण्याची कोर्टाच्या निर्णयामुळे मोहीम. मात्र मंदिर विषयाला घेऊन नागरिक रस्त्यावर. प्रशासनाला अनेक मंदिरे न तोडताच परत जावे लागले.

नागपुरात पावासाळी अधिवेशन
6)6 जूलै - ज्या नागपुरात नेहमी हिवाळी अधिवेशन होते, तिथे पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. परंतु पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच विधान भवन सत्र सुरु असताना बंद पाडले. तसेच शहरातही अनेक ठिकाणी पूर स्तिथी निर्माण झाली होती.

नागपुरातही 'निर्भया'
7) ऑगस्ट 14 - वेस्टर्न कोलफील्ड्सच्या खंडणीत वजनकाट्यावर काम करणाऱ्या तरुणीवर ट्रकचालकांचा बलात्कार, प्रतिकार केला म्हणून तिचा चेहरा दगडाने ठेचून काढला

भाजम आमदार काँग्रेसमध्ये
8) ऑक्टोबर 2 - भाजपचे काटोलचे विधानसभा आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशमुख हे सतत भाजपवर शाब्दिक हल्ला करत आहेत. एवढेच नाही तर नागपुरातून थेट लोकसभा निवडणूक लढायची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

हवाईदलाचा अधिकारी हनी ट्रॅपमध्ये
9) ऑक्टोबर 8 - मिल्ट्री इंटेलिजन्स ने ब्राह्मोस अएरोस्पेसमध्ये काम करणाऱ्या निशांत अग्रवालला उज्वल नगर परिसरातून अटक केली. देशात खळबळ. सोशल मीडियाचा वापर करून आयएसआय कसे भारतीय वैज्ञानिक किंवा इतर संवेदनशील माहिती ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवतात ही बाब या घटनेमुळे चर्चेत आली.

बच्चू कडू यांचे शोले स्टाईल आंदोलन
10) ऑक्टोबर 19 - आमदार बच्चू कडू यांनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शोले स्टाईल दीड दिवस आंदोलन करत आमदार निवास ताब्यात ठेवले. यावेळी हजारो प्रकल्पग्रस्त त्यांच्यासोबत होते.

अवनी वाघिणीची शिकार
11) नोव्हेंबर 3 - टी वन (अवनी)वाघिणीला यवतमाळच्या जंगलात गोळ्या घालून ठार करण्यात आले. या घटनेमुळे देशभरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारवर हल्ला केला.

राम मंदिरासाठी कायदा करण्याची आरएसएसची मागणी
12) नोव्हेंबर 25 - विश्व हिंदू परिषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक सघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढा नाहीतर कायदा करा असा इशारा सरकारला दिला. परत एकदा राम मंदिर हा राजकारणाचा विषय म्हणून निवडणुकीदरम्यान उदयाला आला.

अमिताभ बच्चन नागपुरात
13) डिसेंबर - सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी नागपुरात झुंड या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात केली. नागपूरच्या विजय बारसे या स्लम सॉकर शिकवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा सेंट जॉन शाळेत उभारलेल्या सेटवर शूट होत आहे.

मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात
14) डिसेंबर 12 - नागपूर मेट्रोने खापरी ते सीताबर्डी या आपल्या पहिल्या रिचमध्ये अखेरचा काँक्रीट सेगमेंट उभारून काँक्रिटीकरणाचे कामे पूर्ण केले. लवकरच आता या रिचवरील 10 स्टेशन्सवर मेट्रो धावू लागेल अशी अपेक्षा आहे.

वकिलाची हत्या
15) डिसेंबर 21 - नागपूरच्या जिल्हा स्तर न्यायालयासमोर सदानंद नारनवरे या ६२ वर्षीय वकिलांवर त्याचाच जुनियर लोकेश भास्कर याने कुऱ्हाडीने हल्ला करत गंभीर जखमी केले. नंतर घटनास्थळावरच विष प्रश्न करून आत्महत्या केली.