नागपूरः गणेशोत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक असल्याने तयारीला वेग आला आहे. लवकरच बाप्पाचे घरोघरी आगमन होणार असल्याने लोकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. बाजारपेठासुद्धा यासाठी सजल्या असून सजावटीसाठी नव-नवीन साहित्य बाजारात आले आहे. मात्र यंदा सजावटीच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने सजावटीला महागाईची झळ बसली आहे. मागील दोन वर्ष हा सण साधेपणाने साजरा करण्यात आला. परंतु यंदा सर्व निर्बंध हटल्याने भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विक्रेत्यांमध्येही चैतन्य पसरले आहे. 
 
गणेशोत्सवात दरवर्षी लोक आपल्या घरी बाप्पाच्या सजावटीत थर्माकोलपासून बनलेले आसन, आर्च आणि मंदिरांचा उपयोग करीत होते. परंतु यावर्षी सरकारने थर्माकोलवर बंदी आणल्याने हे उत्पादन बाजारातून गायब झाले आहे. आता थर्माकोलची जागा कापड आणि ऐक्रेलिकपासून तयार फुलं आणि विविध कलाकृतींनी घेतली आहे. शहरात जवळपास 40 ठोक विक्रेते असून किरकोळमध्ये सजावटी साहित्य विकणारे मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक गल्ली-मोहल्ल्यात विक्रेते आपली दुकाने लावत आहे. 

Continues below advertisement


500 पेक्षा अधिक सजावटी वस्तू 


बाजारात सजावटीच्या 500 पेक्षा अधिक वस्तू असून यात विविध प्रकारची लडी, आसन, झुमके, तोरण, झुमर, आर्च, आसन आदींचा समावेश आहे. तसे पाहिल्यास या वस्तू दिल्ली आणि अहमदाबादमधूनही येतात. परंतु बहतांश माल आता शहरातच तयार होत आहे. 


Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव मंडळांसाठी कलाकारांचे नि:शुल्क सांस्कृतिक कार्यक्रम


7,500 रुपयांपर्यंत सजावटी सेट


बाप्पाच्या छोट्या आसनपासून विविध प्रकारच्या सेटने बाजार सजले आहे. तर आर्च 1,300 ते 3,500 रुपयांपर्यंत आहे. पूर्णत: तयार सेट 4,000 ते 7,500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. विविध प्रकारचे हार ज्यात फूल, पान, रंगीत कापड आदींचा समावेश आहे. 70 ते 3,500 रुपयांपर्यंत याची रेंज आहे. 


अनेकांना मिळतोय रोजगार


बहुतांश लोक स्वत:च घराची सजावट करणे पसंद करतात. काही लोक छोट्या डेकोरेटरला ऑर्डर देतात. त्यामुळे शहरात हजारोंच्या संख्येने लोकांना रोजगार मिळत आहे. डेकोरेशनसह लायटिंगवालेही व्यस्त झाले आहे.


Dahi Handi : जय महाकाली पथकाने फोडली हिवरी नगर येथील 'महागाईची हंडी', पथकाला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचा रोख पुरस्कार


गणेशोत्सव मंडळांसाठी कलाकारांचे नि:शुल्क सांस्कृतिक कार्यक्रम


नागपूरः मागिल दोन वर्षांपासून निर्बंधात असलेल्या गणेशोत्सवावर यंदा कुठलेही निर्बंध नाही. नागपुरकरांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा या उद्देशाने गणेशोत्सव मंडळ आणि सोसायट्यांसाठी निशुल्क सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने पुढाकार घेतला आहे. या 'सांस्कृतिक गणेशोत्सव' अंतर्गत गायन, वादन, नृत्य, नाटक, गीतरामायण, देशभक्तीपर कार्यक्रम, कविसंमेलन, एकांकिका आदींसाठी शहरातील कलाकार निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी मंडळ आणि सोसायट्यांना 27 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहे.