Nagpur News : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकाच्या नावावर सायबर गुन्हेगाराने (Cyber ​​criminal) बँक ऑफ इंडियाला 15.81 लाख रुपयांचा चुना लावला. फोन आणि ईमेलच्या माध्यमातून दोन वेळा बँक व्यवस्थापकाला साथीदारांच्या खात्यात रक्कम वळती करण्यास लावले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात बँक अधिकाऱ्याला संशय आला आणि पोलिसात तक्रार करण्यात आली. सदर पोलिसांनी बँक ऑफ इंडियाच्या (Bank of India) मुख्य शाखेचे व्यवस्थापक विजय रामटेके यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे.


बँक ऑफ इंडिया, सदर शाखेत शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक खेमका यांचे खेमका मोटर्स व खेमका मोटर्स प्रा. लि. या नावाने दोन बँक खाते आहे. फार जुने खाते असल्याने कधी फोनव्दारे तर कधी मेलव्दारे व्यवहार होतो. बँक आणि खेमका यांच्या खात्यासंबधीची संपूर्ण माहिती आरोपीने काढली. विशेष म्हणजे जय शिवशंकर हे खेमका मोटर्स प्रा. लि.च्या बँक खात्यात भागीदार आहेत ही सुध्दा माहिती आरोपीने घेतली. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अज्ञात आरोपीने बँक व्यवस्थापक राहुल भोंगे यांना फोन केला. मी जयशिवशंकर खेमका बोलतोय अशी बतावणी केली. माझे चेकबुक संपले आहे. निंतात गरज असल्याने खेमका मोटर्सच्या खात्यातून 8 लाख 16 हजार रुपये डीसीबी बँकेचे खातेधारक रिजवान खान यांच्या खात्यात वळते करण्याची विनंती केली. तसेच मेलवरही खात्याची माहिती पाठविली. नेहमीचेच ग्राहक असल्याने आणि मेल तसेच फोन केल्यामुळे बँक व्यवस्थापकानेही उपरोक्त रक्कम रिजवानच्या खात्यात वळती केली.


पुन्हा 2 दिवसांनी केला फोन 


पुन्हा दोन दिवसांनी आरोपीने फोन करून खेमका मोटर्स प्रा. लि. च्या खात्यातून 7 लाख 65 हजार रुपये आयसीआयसीआय बँकेतील खातेधारक राहुल कुमार याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. बँकेने ती रक्कमही वळती केली. त्यानंतर आरोपीने तिसऱ्यांदा फोन करून 8.96 लाख रुपये एचडीएफसी बँकेचा खातेधारक दिनेश कुंभार याच्या खात्यात वळते करण्यास सांगितले. यावेळी मात्र भोंगे यांना दोन्ही फर्मचे मिळते-जुळते नाव असल्याने काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी ती रक्कम परत खेमका यांच्या खात्यात जमा केली. तपासात फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बँक अधिकाऱ्यांनी विभागीय चौकशीनंतर सदर पोलिसात घटनेची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हेगारी षडयंत्र, फसवणूक आणि आयटी अॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.


ही बातमी देखील वाचा


Nagpur GMC : शासकीय वैद्यकीय रुग्णालयात X-Ray फिल्मचा तुटवडा, ए