Nagpur accident News : जिल्ह्यातील काटोल तालुक्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बोलेरो पिकअपचा अपघात झाला असून, यामध्ये चार महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत इतर पाच महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत. आज पहाटे काटोल तालुक्यातील ईसापुर-घुबडमेट रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


परिसरातील संत्राच्या बागेत संत्रा तोडण्यासाठी या महिला मजूर एका बोलेरो पिकअपमधून जात होत्या. यावेळी बोलेरे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन एका झाडावर जाऊन आदळले. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये तीन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला मजुरीचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे.  इतर पाच महिला मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मनीषा सलाम, मंजुळा उईके, कलाताई परतेती आणि मंजुला धुर्वे या महिला मदुरांचा मृत्यू झाला आहे.


मागील काही दिवसापासून सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक वेळेला या अपघातांमध्ये मृत्यू देखील झाले आहेत. मागच्या 3 दिवसापूर्वीच औरंगाबादमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. मिनी ट्रक आणि ऊसाच्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली होती. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होती. तर 12 जण जखमी झाले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड जवळ हा अपघात झाला होता. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली होती. तसेच मागच्या चार दिवसापूर्वी हिंगोलीमध्ये लग्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. तर 20 ते 25 जण जखमी झाले होते. हिंगोली ते नांदेड रोडवरील पार्डी मोड फाट्यावर बुधवारी हा अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: