एक्स्प्लोर

नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, हल्ल्यात महापौर थोडक्यात बचावले

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्यावर हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या.

नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्त एकीकडे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात संदीप जोशी थोडक्यात बचावले. महापौर संदीप जोशी काल रात्री त्यांचे कुटुंबीय आणि काही निवडक मित्रांसह नागपूरच्या आऊटर रिंग रोडवरील रस रंजन धाब्यावर जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. पोलीस  सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

संदीप जोशी यांच्या लग्नाचा काल वाढदिवस असल्याने कुटुंबीय आणि मित्रांनी तिथे कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. कार्यक्रम आटपून सर्व मित्र नातेवाईक नागपूरकडे परतत असताना संदीप जोशी एका मित्रासह त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्ये सर्वात मागे होते. 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास त्यांची कार आऊटर रिंग रोडवर परसोडी जवळील एम्प्रेस पॅलेसजवळ असताना मागून बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी संदीप जोशी यांच्या चालत्या कारवर 3 गोळ्या झाडल्या. तिन्ही गोळ्या संदीप जोशी यांच्या कारला लागल्या. एक गोळी संदीप जोशी यांच्या बाजूच्या काचेतून कारच्या आत शिरली. तर दुसरी गोळी कारच्या मागील सीटमध्ये शिरली. तिसरी गोळी कारच्या मागील बाजूला लागली.

संदीप जोशी स्वतः कार चालवत होते, मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले. हल्ला झाला त्यानंतर प्रसंगावधान राखत संदीप जोशी यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला वळवली. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर काल रात्रीपासूनच संदीप जोशी यांचा पाठलाग करत असावे, असा अंदाज आहे. दरम्यान गेल्या 12 दिवसात संदीप जोशी यांना पत्राच्या माध्यमातून दोन धमक्या आल्या होत्या. त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्याच धमक्यांचा संबंध या हल्ल्याशी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पहाटेपर्यंत बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या समोर जमले होते. मी सुखरुप आहे, अशी प्रतिक्रिया संदीप जोशी यांनी दिली आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu: देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Nagpur Crime: शिक्षकाने वर्गात उठाबशा काढायला लावल्या, विद्यार्थ्याने गळ्याला दोर लावला, हायकोर्टाकडून शिक्षकांची निर्दोष सुटका
शिक्षकाने वर्गात उठाबशा काढायला लावल्या, विद्यार्थ्याने गळ्याला दोर लावला, हायकोर्टाकडून शिक्षकांची निर्दोष सुटका
Tukaram Mundhes FDA Raid: तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, प्रसिद्ध स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर, तर पाकिस्तानी ब्युटी क्रिमचाही केला पर्दाफाश
तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, प्रसिद्ध स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर, तर पाकिस्तानी ब्युटी क्रिमचाही केला पर्दाफाश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Embed widget