Wardha : नागपूर- अमरावती (Nagpur Amravati Highway) महामार्गवर कारंजा (घाडगे) जवळ हेटीकुंडी फाट्यावर काँग्रेसचे (Congress MLA) माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला. जवळजवळ दोन तास सुरू असलेल्या या आक्रमक आंदोलनात अमरावती नागपूर  महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या.


कारंजा (घाडगे) तालुक्यात जंगल भागाला लागून असलेल्या काही गावांत वन्य प्राण्यांमुळे दहशतीचे आणि काळजीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांमूळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना सौर कुंपण द्यावे, शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा; आदी मागण्या यावेळी आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी रेटून धरलेल्या आहेत.


पीडितांसाठी मदतीची हाक


जवळपास दोन तास रास्ता रोको मोठ्या संख्येने एकत्रित येत गावकऱ्यांनी केला. या आंदोलनात मोठ्या संख्येने गावातील शेतकरी, नागरिकांनी सहभाग नोंदवला. निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठणाऱ्या हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपये आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एका सदस्यास नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी (Demand from Protestor) आंदोलकांनी केली.


वाघाच्या हल्ल्यांमुळे अनेक संसार उघड्यावर 


बोर अभयारण्य (Bor Sanctuary) हे तालुक्याच्या जंगल भागाला लागून  आहे, या  गावाशेजारी वाघाची दहशत पसरली आहे.  आतापर्यंत झालेल्या   वाघाच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले, त्यामुळे कित्येकांचा संसार उघड्यावर आला, अनेक शेतकऱ्यांच्या  जनावरांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला, याची रीतसर  नोंद वनविभागाकडे आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिक दहशीत आहे.त्यामुळे  ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू या घटनेत झाला, त्या   कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरित सामावून घावे अशी मागणी जोर धरत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


ABP CVoter Survey : गुजरातमध्ये कुणाला मिळणार सत्ता? आपनं काँग्रेसला दिला धक्का, जाणून घ्या जनतेचा कौल


Dasra 2022 : शत्रूंचा पराभव करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार करा 'हे' काम