Dasra 2022 : पंचांगानुसार दसरा हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी दसऱ्याचा सण 5 ऑक्टोबर रोजी आहे. दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
राशीनुसार दसऱ्याला पूजा करा
मेष : दसऱ्याच्या दिवशी गणपतीची पूजा करून दुर्वा आणि लाडू अर्पण करावेत. असे मानले जाते की असे केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि पापे नष्ट होतात. शिवाय घरात सुख-समृद्धी वाढते.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी शंकराची पूजा करावी.
मिथुन : ज्योतिषशास्त्रात मंगळ हा मिथुन राशीचा स्वामी मानला जातो . दसऱ्याच्या दिवशी थोडा गूळ घेऊन लाल कपड्यात बांधून जमिनीखाली ठेवावा. यामुळे मनातील इच्छा पूर्ण होते असे मानले जाते.
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून घरात आणावा. असे मानले जाते की या झाडूच्या वापराने घरातील गरिबी दूर होते आणि दुःख दूर होतात.
सिंह : या राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी गरिबांना मदत करावी.
कन्या : दसर्याच्या दिवशी भगवान श्रीरामाला गुळा अर्पण करावा .
तूळ : विजय दशमीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी हनुमानाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत. यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील.
वृश्चिक : विजयादशमीच्या दिवशी गरजू लोकांना दान करावे. यामुळे देवाची कृपा होते.
धनु : या राशीच्या लोकांनी बुद्धी देणारी देवता गणेशाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.
मकर : दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा करून 11 ब्राह्मणांना भोजन द्यावे .
कुंभ : विजयादशमीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी हनुमानाच्या समोर हनुमान चालिसाचे पठण करावे.
मीन : नारायणाची उपासना करा आणि आपल्या क्षमतेनुसार गरीब व गरजूंना दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
महत्वाच्या बातम्या
- Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत
- Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय