Earthquake In Nagpur : नागपूर (Nagpur) जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाच्या (Earthquake) धक्क्याची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड भागात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडलीय. यात 2.7 रेक्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. काल, 4 एप्रिलला दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake) बसले होते. शनिवारच्या दुपारी 2 वाजून 24 मिनिटांनी 2.4 रिक्टर स्केलच्या भूकंपाचा सौम्य धक्का बसला, याचे केंद्र कुही होते. तर शुक्रवारी दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी 2.5 रिक्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यावेळी त्याचे केंद्र पारशिवनी होते. भूकंपाच्या (Earthquake) स्थितीतून अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आणि या पूर्वी क्वचितच अनुभवायला मिळालेल्या नागपूर शहरात (Nagpur) सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाच्या (Earthquake In Nagpur) धक्क्याची नोंद झालीय. तर महिनाभराच्या काळात हा चौथा धक्का असल्याने उलटसुलट चर्चा आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

  
भूकंपाचे (Earthquake) हे धक्के अतिशय सौम्य असून, त्याची जाणीवही नागरिकांना झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे महिनाभराच्या अंतरात हा चौथा धक्का होय. यापूर्वी 27 मार्चला अशाचप्रकारे दुपारी नागपूरजवळ हिंगणा आणि पारशिवनी भागातच दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद भूकंप विज्ञान विभागाने केली होती. तर काल दुपारी पुन्हा अशाच प्रकारे भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चिंता पाहायला मिळत आहे.


नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाची नोंद


भूकंप (Earthquake) हे नाव जरी उच्चारले तरी अंगाचा थरकाप उडवतो. क्षणात होत्याच नव्हतं करणारे अनेक भूकंपाच्या घटना जगभरात घडत असतात. त्याची विदारक चित्र बघितले की निसर्गापुढे मनुष्य किती खुजा आहे, हे क्षणात लक्षात येतं. मात्र हाच भूकंप कधी आपल्या आजूबाजूला झाला तर? कल्पना देखील करवत नाही. मात्र, असे असले तरी उपराजधानी नागपुरात (Nagpur) आज पुन्हा दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake) बसले आहेत. महिनाभराच्या अंतरात नागपुरात बसलेला हा चौथा भूकंपाचा धक्का असल्याचे बोललं जातंय. मात्र, भूकंपाची 2.7 रिश्टर स्केल श्रेणी भीतीदायक नसून अशा प्रकारचे भूकंप अधून मधून होत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.


भूकंप आल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काय कराल?


तुम्ही घरात असताना भुकंपाचे हादरे जाणवले तर टेबल किंवा बेड खाली जाऊन बसू शकता. याशिवाय इतर मार्गाने स्वत:ला कव्हर करुन शांतपणे एकाच ठिकाणी थांबू शकतात. शिवाय, तुम्ही भितींजवळ उभे राहू शकता. मात्र, खिडकी आणि फर्निचर शेजारी उभे राहणे, आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी उभे राहणे टाळले पाहिजे. तुम्ही घरापासून दूर किंवा बाहेर असला तर सावध राहा. इमारती, वीजेचे खांब अंगावर कोसळू शकतात. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. वाहन चालवताना भूकंपाचे धक्के जाणवत असल्यास गाडी थांबवा. स्वतःला रहदारीपासून दूर ठेवा, अस तज्ज्ञ सांगतात. 


इतर महत्वाच्या बातम्या