Nagpur News : मध्यवर्ती कारागृहाचा विशेष उपक्रम; बंदीवानांना 'गळाभेटच्या' माध्यमातून कुटुंबीयांची भेट, डोळ्यात दाटले आनंदाश्रू
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरातील कारागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत नागपुरात सिद्धदोष बंदीवानांसाठी गळाभेट कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार्यक्रमांतर्गत कारागृहातील ज्या बंदीवानांची मुले 18 वर्षांपेक्षा कमी आहेत, त्यांना भेटण्याची संधी देण्यात आली.
आपल्या प्रियजनांना भेटल्यानंतर बंदिवान आणि त्यांची मुले या दोघांनीही भावनिक हितगुज केले. तसेच या प्रत्यक्ष भेटीचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
यावेळी कैद्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य, ईतर विषयी विचारपूस करत भावनिक साद घातली.
त्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात शनिवारचा दिवस भावपूर्ण होता. बराच काळ कारागृहात असलेल्या बंदीवानांना आज आपल्या मुलांना छातीशी घट्ट धरून ठेवण्याची संधी मिळाली.
आपल्या प्रिय व्यक्तींना जवळ आल्याने बंदिवान तसेच त्यांच्या मुले आनंदाने भारावून गेले. शनिवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात गळाभेट आयोजित केले होते.
यामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या शहरातील स्थायिक असलेल्या मुलांनी कारागृहातील असलेल्या आपल्या परिजनांची भेट घेतली. यामध्ये लहान मुलांसह किशोरवयीन मुलांचाही समावेश होता.
मुलांना भेटून बंदिवानांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. कैद्यांनी बंदीवानांनी आपल्या मुलांना मांडीवर बसवत त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. आणि त्यांना स्वतःच्या हाताने जेवणही दिले.
कैद्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा खरा उद्देश आहे. जेणेकरून ते चुकीचा मार्ग सोडून आपल्या कौटुंबिक जीवनातील नैतिक जबाबदाऱ्या पार पाडू शकेल.
आपल्या कुटुंबप्रमुखाला बराच काळा नंतर भेटल्याचा आनंदत्यांचा लहान मुलांचा चेहऱ्यावर दिसून आला.