नागपूर : महाराष्ट्र राज्य लवकरच सॅटेलाईट (Satellite) लाँच करण्याच्या तयारीत असल्याचा दावा मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केला आहे. दरम्यान त्यामुळे स्वत:चे सॅटेलाईट असणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरणार का हा प्रश्न आता प्रत्येकालाच पडला आहे. राज्यात उद्भभवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Disasters) मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे यावर काहीतरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सातत्याने करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीबाबत योग्य माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पहिले सॅटेलाईट लाँच करण्यात येणार असल्याचं यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाऊस, , भू स्खलन, समुद्राखालच्या हालचाली, चक्रीवादळ, भूगर्भातील हालचाली या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी हे सॅटेलाईट मदत करणार असल्याचं यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल पाटील?
नागपुरात आलेल्या पुराचे वेळेवर अलर्ट देण्यास हवामान विभाग अपयशी ठरल्याबाबत यावेळी मंत्री अनिल पाटील यांना विचारण्यात आले. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आम्ही मदत आणि पुनवर्सन विभागामार्फत एक सॅटेलाईट बनवण्याच्या विचारात आहोत. हे सॅटेलाईट दर दोन तासांनी नैसर्गिक आपत्तीबाबत सतर्क करण्यास मदत करु शकेल. त्यामुळे मुसळधार पाऊस, भू स्खलन, समुद्र खालच्या हालचाली,चक्रीवादळ आणि भूगर्भातील हालचाली अशा सर्वांबाबत माहिती मिळू शकले.'
सॅटेलाईटचा अभ्यास करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची नेमणूक
दरम्यान या सॅटेलाईटचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ शास्त्रज्ञांची नेमणूक करुन अभ्यास करत असल्याचं मंत्री अनिल पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना अनिल पाटील यांनी म्हटलं की, 'शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानंतर पुढटी पावलं उचलण्यात येतील. या सॅटेलाईटमुळे कृषी विभाग, वन विभाग आणि इतर विभागांना कसा फायदा होईल याचा ही विचार सुरू आहे. हे सॅटेलाईट लगेगच लाँच करण्यात येणार नाही. तर त्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. कारण त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे जर हे सॅटेलाईट लाँच झाले तर स्वत:चे सॅटेलाईट असलेले महाराष्ट्राचे मदत पुनर्वसन विभाग देशातील पहिलेच विभाग ठरणार असल्याचा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे.'
मंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवार (29 सप्टेंबर) रोजी नागपुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासनिक अधिकाऱ्यांसह खास आढावा बैठक देखील घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी नुकसान आणि पंचनाम्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे याची देखील माहिती त्यांनी यावेळी घेतली.
हेही वाचा :
Nagpur Flood : पुरानंतर नागपुरातील वस्त्यांमध्ये जीवन हळूहळू पूर्वपदावर, पण अनेक ठिकाणी चिखल कायम