एक्स्प्लोर

काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, वसंत पुरकेंची जीभ घसरली

जनसंघर्ष यात्रेदरम्यान वसंत पुरके यांनी मोदींवर टीका करताना त्यांचा बाप काढत काँग्रेसची सत्ता आल्यावर नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केला.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेते वसंत पुरके यांची जीभ घसरली आहे. जनसंघर्ष यात्रेदरम्यान वसंत पुरके यांनी मोदींवर टीका करताना त्यांचा बाप काढत काँग्रेसची सत्ता आल्यावर नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. विशेष म्हणजे जनसंघर्ष यात्रेच्या आधीच्या टप्प्यातही वसंत पुरके यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेचा पाचवा टप्पा पूर्व विदर्भात सुरु झाला आहे. काल नागपुरात दीक्षाभूमी, ताजुद्दीन बाबांचा दर्गा आणि गणेश टेकडी मंदिराचे दर्शन घेत यात्रेला सुरुवात केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी आणि रामटेक या दोन ठिकाणी काँग्रेसची सभा झाली. या सभांमधून काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. वसंत पुरके यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी एकेरी भाषेत बोलत मोदींच्या 'काँग्रेस मुक्त भारत'च्या घोषणेचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस काही त्यांच्या बापाची मालमत्ता नाही, असं पुरके म्हणाले. शेकडो महिलांचे आयुष्य बरबाद करणारा बाबा राम रहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अष्टपैलू वाटतो. माझा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला आहे, त्यांनी बाबा राम रहीमला आपल्या घरी घेऊन जावे. बाबा तुम्हाला एखादा पैलू दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भाजपावर हल्लाबोल केला. गेल्या निवडणुकांच्या वेळेस दिलेल्या घोषणा अजून पूर्ण झालेल्या नसताना भाजप नेत्यांनी नव्या आश्वासनाची जुमलेबाजी सुरु केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. आता भाजप नेत्यांनी सवर्णांना 10 टक्के आरक्षणाची नवी जुमलेबाजी सुरु केली आहे. मात्र आधी घोषणा केलेल्या मराठा आरक्षणाचे काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाचे विषय अजून प्रलंबित असताना भाजपने सवर्ण आरक्षणाची जुमलेबाजी सुरु केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Maharashtra Weather Updates: नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट
नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
Embed widget