एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायदा प्रारुप स्थगित, डिसेंबरमध्ये नवा कायदा आणणार, चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

Chandrashekhar Bawankule : देवस्थान इनाम जमीन कायदा प्रारुप स्थगित करण्यात आल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

नागपूर : राज्याचे महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देवस्थान इनाम निर्मूलन कायद्यासंदर्भात माहिती दिली. ते नागपूर येथे बोलत होते. यावेळी बावनकुळे यांनी राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात कायदा करणार असल्याचं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

राज्यात ज्या साडे पाच लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनी आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देवस्थानला जमिनी मिळाल्या होत्या. साडे पाच लाख हेक्टर जमिनीवर अनेक अतिक्रमणं झाली आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. देवस्थानच्या जमिनी त्यांच्याकडे नाहीत, काही ठिकाणी कूळ कायदा लागलेला आहे, काही ठिकाणी वहिवाट लागलेली आहे.त्यामुळं देवस्थानच्या जमिनी असूनही देवस्थान वापर करु शकत नाही, अतिक्रमित आहेत. म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विचार केला होता की महसूल खात्यानं यामध्ये पुढाकार घ्यावा, कारण जमिनी महसूलच्या आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

साडे पाच लाख हेक्टर जमिनी देवस्थानला मिळाव्यात 

या जमिनी पुन्हा देवस्थानला मिळाव्यात, देवस्थानचे हक्क स्थापित व्हावेत. देवस्थान जमिनींवरील अतिक्रमण सरकारनं कमी करुन द्यावं. कारण देवस्थान जमिनींवर बलाढ्य लोकांचं अतिक्रमण असल्यानं  देवस्थान काही करु शकत नाही, असं बावनकुळेंनी म्हटलं.  

देवस्थानला साडे पाच लाख हेक्टर जमिनी मिळाव्यात. कूळ कायद्याचं संरक्षण व्हावं. ज्या कुळानं केलेल्या आहेत त्या कुळानं कराव्यात, असा कायदा महाराष्ट्र सरकारनं आणण्याचा विचार केला होता.  6 मे रोजी कायद्याचं प्रारुप सार्वजनिक केलं होतं. त्यावर आक्षेपासाठी 5 जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या प्रारुपावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आल्यानं  जाहीर केलेले प्रारुप स्थगित करतोय, अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

डिसेंबरमध्ये कायदा आणणार 

महसूल एसीएस विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली, दोन विभागीय आयुक्त, दोन जिल्हाधिकारी, तीन उपसचिव आणि  पंधरा देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करुन हा कायदा आलाय, आक्षेप आले आहेत, आक्षेपांची सुनावणी घेऊन नवीन कायदा राज्यात आणणार आहे.  15 ऑगस्टपर्यंत सूचना हरकतींवर सुनावणी घेऊ, 15 सप्टेंबरपर्यंत नवा कायदा राज्यात आणू आणि डिसेंबरच्या अधिवेशनात देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा,देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा महाराष्ट्रात येणार आहे. 

देवस्थानांच्या मनामध्ये आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या मनामध्ये कायद्यासंदर्भात संभ्रम झालेला होता तो दूर करावा, सरकार प्रत्येक आक्षेपाची सुनावणी घेऊ, पुढच्या तीन महिन्यात नवा कायदा आणणार आहे.

या कायद्यावर जनतेनं आणि देवस्थानांनी आक्षेप घ्यावेत यासाठी पब्लिक डोमेनमध्ये गेलो आहे. साडे पाच लाख हेक्टर जमिनी देवस्थानाच्या हातून जाऊ नयेत यासाठी हा कायदा आणतोय. काही देवस्थांनी गैरसमज केलेत ते दूर करु, हा कायदा तयार झाल्यानंतर पब्लिक डोमेनला टाकू आणि अधिवेशनात जाऊ, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. प्रतिनिधींची नियुक्ती महसूल मंत्री नियुक्त करतील. देवस्थानांसाठी लढणाऱ्या वकिलांना या समितीवर घेणार आहे,असंही ते म्हणाले.

ज्या जमिनी 100 वर्ष 200 वर्ष देवस्थानच्या ताब्यात नाहीत, त्या वहिवाटीला आहेत, कुळात आहेत,त्याचा  वेगळा निर्णय करावा लागेल. ज्या देवस्थानला सरसकट मिळू शकतात, त्या सरसकट घ्याव्या लागतील. ज्या जमिनी  खासगी लोकांकडे गेल्या आहेत, त्यातील काहीतरी देवस्थांना मिळाव्यात यासाठी देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा राज्यात असावा, अशी भूमिका असल्याचं बावनकुळे म्हणाले. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Embed widget