चंद्रपूर : दारुबंदीनंतरही चंद्रपूर जिल्ह्यात दारुचा अवैध पुरवठा बिनबोभाट सुरुच आहे. मारुती झेन कारच्या दारात दारुच्या असंख्य बाटल्या लपवून दारुची तस्करी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गाडीच्या दारांच्या आत लपवलेली अवैध दारु हस्तगत करुन दोघा आरोपींना अटक केली.
तळीरामांची आयडिया पाहून पोलिसही चक्रावले आहेत. चंद्रपूर शहरात प्रवेश करणाऱ्या जनता महाविद्यालय चौकात पोलिसांनी पाळत ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार मारुती झेन कार चौकात थांबताच पोलिसांच्या पथकाने वाहनाला गराडा घातला. गाडीतील दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर वाहनांची तपासणी सुरु झाली. मात्र पोलिसांना काही केल्या अवैध दारुचा मागमूस लागत नव्हता.
गाडीत दारुचा वास तर येत होता, त्यामुळे काय करावं, हे पोलिसांना सुचेना. अखेर, दाराची बाजू अधिक वजनदार असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी दारे उचकटून बघण्याचं ठरवलं. बघता बघता दरवाजे आणि डिक्कीच्या आत लपवलेल्या देशी दारुचा वर्षावच झाला.
मारुती झेन कारचा दारुच्या तस्करीसाठी आश्चर्यकारक वापर होत असल्याचं पोलिसांच्या ध्यानात आलं. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत पाच पेट्या देशी दारु जप्त केली. पोलिस आता या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
संबंधित बातम्या :
चंद्रपूरमध्ये कांद्याच्या ट्रकमधून 70 पेट्या दारुसाठा जप्त
दारुविक्रेतीची भलती आयडिया, देव्हाऱ्यामागे दारुसाठा लपवला
दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात कारच्या दारातून दारुच्या बाटल्यांची तस्करी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jan 2019 12:36 PM (IST)
गाडीत दारुचा वास तर येत होता, त्यामुळे काय करावं, हे पोलिसांना सुचेना. अखेर, दाराची बाजू अधिक वजनदार असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी दारे उचकटून बघण्याचं ठरवलं. बघता बघता दरवाजे आणि डिक्कीच्या आत लपवलेल्या देशी दारुचा वर्षावच झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -