Chandrakant Wankhede, नागपूर : "समाजात आधीच सांस्कृतिक वर्चस्ववाद असून त्यास सत्तेची सोबत मिळाल्यामुळे आता तर सांस्कृतिक दहशतवाद ही फोफावला आहे... समाजात एवढं सांस्कृतिक भेद असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन एकाच ठिकाणी एका मंडपात होणे शक्यच नाही.. तो विचार आम्हाला मान्य नाही" अशा शब्दात विद्रोही साहित्य संमेलन चळवळीशी संबंधित दिग्गजांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन एकत्रित घेण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे... दिल्लीत होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणीच विद्रोही साहित्य संमेलनही एकत्रितपणे व्हावं असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी ठेवण्यात आला होता.. त्यास आता विद्रोही साहित्य संमेलन चळवळीशी संबंधित चंद्रकांत वानखेडेनी तीव्र विरोध दर्शवला आहे... चंद्रकांत वानखेडे वर्ध्यात झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते..


एका बाजूला सांस्कृतिक वर्चस्ववाद टिकवण्यासाठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने चर्चा केली जाते.. जय श्रीराम च्या घोषणा दिल्या जातात आणि त्यामागून राजसत्तेशी जवळीक साधून जास्तीत जास्त फायदे लाटले जातात.. मुळात साहित्य संमेलने राजसत्तेची बटीक झाली असून यवतमाळचे साहित्य संमेलन त्याचे दुर्दैवी उदाहरण असल्याचेही वानखेडे म्हणाले... सध्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुख्यमंत्री किंवा सत्तेची माणसं निश्चित करतात आणि असा सांस्कृतिक वर्चस्ववाद, दहशतवाद सुरू असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन वेगवेगळे होणे साहित्य विश्वात फूट पाडण्याचा प्रयत्न नसून या दोन विचारांमध्ये आधीच फूट पडली आहे.. त्यामुळेच दोन वेगवेगळे साहित्य संमेलन घेणे आवश्यक असल्याचा दावाही वानखेडे यांनी केला...


साहित्य विश्वातील काहींना वाटतंय समता आणि समरसतेचे नावाखाली आम्ही (विद्रोही साहित्यिकांनी) आपला अस्तित्व सोडून द्यावं.. त्यांना वाटतंय की वाघाच्या पोटात शेळीने स्वतःहून चालत जावं.. मुळात समरसतेची ही संकल्पनाच खोटी असून खरी समरसता आणायची असेल तर दोघांचे अस्तित्व स्वतंत्र ठेवणे आवश्यक असल्याचेही वानखेडे म्हणाले... एक देश एक निवडणूक असे म्हंटले जात असेल, तरी "एक देश आणि एक सांस्कृतिक प्रवाह" असे कधीच म्हणता येणार नाही.. कारण सांस्कृतिक प्रवाह वेगवेगळे असतात.. त्यामुळं वेगवेगळे साहित्य संमेलन होणेही आवश्यक असल्याचे चंद्रकांत वानखेडे म्हणाले... महात्मा फुलेंच्या काळापासून विद्रोही साहित्याची चळवळ सुरू असून साहित्य क्षेत्रातील वेगवेगळे प्रवाह आपापल्या परीने अभिव्यक्ती करतात आणि त्यामुळे समाज आणि देशाचा कुठलेही नुकसान होत नाही.. अशा वेगवेगळ्या प्रवाहांची घुसळन झाली तेव्हाच त्याच्यातून अमृत निघू शकेल अन्यथा फक्त विषच बाहेर पडेल असेही वानखेडे म्हणाले...


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला एक महिना पूर्ण! हत्येचा घटनाक्रम काय? आतापर्यंत काय-काय झालं?