नागपूर : ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळा फी वसुलीसाठी पालकांवर दबाव आणत असल्याचे आरोप होत असताना त्याच शाळा आपल्या शिक्षकांना मात्र वेतन देत नसल्याचा आरोप होतोय. राज्यातील सीबीएससी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कमर्चाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर कपात केली जात आहे. त्यामुळे राज्यातील 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जीवनमरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा आरोप सीबीएसई स्कुल स्टाफ वेलफेयर एसोसिएशन ( सिसवा ) ने केला आहे.


राज्यात सीबीएससी अभ्यासक्रमाच्या सुमारे 800 मोठ्या शाळा असून 70 हजारांपेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाविना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेत कोणतेही शिक्षण कार्य होत नसताना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांमागे फी साठी तगादा लावणाऱ्या शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र, 50 ते 60 टक्केच पगार देत असल्याचा आरोप सिसवाच्या अध्यक्षा दीपाली डबली यांनी केला आहे. शिवाय जे शिक्षक ऑनलाईन शिक्षणाच्या प्रक्रियेत नाही, म्हणजेच ज्यांच्या विषयांचे ऑनलाईन शिक्षण दिले जात नाहीये, त्यांना तर "नो टिचिंग नो सॅलरी" या तत्वानुसार वेतन नाकारले जात असल्याचा आरोप ही सिसवाने केला आहे.

दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये : शिक्षणमंत्री

गेल्या तीन महिन्यांत अनेक सीबीएससी शाळांनी शेकडो शिक्षकांना नोकरीवरून काढले आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षकांच्या आर्थिक स्थितीचा मुद्दा खूप मोठा होण्याची शक्यता असल्याचे सिसवाने म्हटले आहे. सिसवाच्या या आरोपांमुळे एका बाजूला पालकांवर फी साठी दबाव आणणाऱ्या सीबीएससी शाळा शिक्षकांसोबत मात्र माणुसकीचा व्यवहार करत नसल्याचे समोर आले आहे. सीबीएससी शाळांच्या व्यवस्थापनाने त्यांचे हे अमानवीय धोरण बदलविले नाही तर सीबीएससी शाळेतील शिक्षकांना आंदोलनात्मक भूमिका घेत रस्त्यावर उतरावे लागणार असा इशारा ही सिसवाच्या अध्यक्षा दीपाली डबली यांनी दिला आहे.

दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये - शिक्षणमंत्री


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI