काही दिवसांपूर्वी नागपूरच्या भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवा, अशी ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. त्यातील एक आवाज साहिल सय्यदचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. पोलिसांनी साहिल सय्यदवर एक गुन्हा नोंदवल्या नंतर एकानंतर एक गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. जमीन बाळकावणे, घरावर कब्जा करणे, खंडणी मागणे, फसवणूक करणे असे गुन्हे दाखल झाल्यानंतर साहिल सय्यदला अटक झाली होती.
नागपूर शहरात प्रस्तावित लॉकडाऊनसंदर्भात पालकमंत्र्यांची भूमिका योग्य नाही, ते राजकारण करताहेत : भाजप
सामान्यांची जमीन बळकावणाऱ्या गुंडाला धडा शिकवण्यासाठी नागपूर महापालिका आणि पोलिसांनी कंबर कसली आणि आज त्याचा आलिशान बंगला पाडायला सुरुवात केली आहे. याआधी कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा बंगला पाडून नागपूरकारांच्या मनातील गुंडांची भीती कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे डीसीपी गजानन राजमाने यांनी या प्रकरणात ही महत्त्वाची भूमिका बजावली आणि आणखी एका गुंडांचा बंगला भुईसपाट करून दाखवला आहे हे विशेष.
यापूर्वी विदर्भातील गँगस्टर संतोष आंबेकरचा आलिशान बंगला जमीनदोस्त
विदर्भाचा स्वयंघोषित डॉन गँगस्टर संतोष आंबेकरच्या नागपुरातील अनधिकृत बंगल्यावर पालिकेचा हातोडा पडला. यासाठी मोठा पोलीस फौजफाटा ही तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या ठोस पाठपुराव्यानंतर महापालिकेने कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त राजमाने आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची खास भूमिका आहे. इतवारी परिसरात संतोष आंबेकर याचा प्रशस्त आणि जयपुरी गुलाबी दगडाने सजवलेला कोट्यवधींचा बंगला होता. त्याने अनेक गुन्हे याच ठिकाणी केल्याची चर्चा आहे.
नागपूर हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी साहिल सय्यदवर वृद्ध आणि निराधारांची संपत्ती बळकावल्याचा आरोप