नागपूर : काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एका पुस्तकावरुन वाद निर्माण झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका पुस्तकारवरुन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झालीय. "शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव" या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी भाजपने केलीय. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. पुस्तकाचे लेखक डॉ. विनोद अनाव्रत आणि पुस्तकाचे प्रकाशक पुण्याचे सुगावा प्रकाशन संस्थेच्या मालका विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील भाजपने केली आहे. भाजपचे राज्य प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केलीय. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे तिथल्या भाजप कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तक्रार ही दिली आहे. या पुस्तकातील प्रत्येक पानावर छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याचं लेखी तक्ररीत म्हटलं आहे.


विशेष म्हणजे त्यासाठी भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीच्या पूर्वी पुस्तकावर बंदीची मागणी केली आहे. शिवाय भाजपच्या अमरावतीच्या कार्यकर्त्यांनी आज तिथल्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार देत पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण दिल्लीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देत छापलेल्या एका पुस्तकामुळे तापले होते. आता पुन्हा छत्रपतींचा संदर्भ असलेल्या एक पुस्तकामुळे वादंग माजण्याची चिन्हे आहेत. शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव" या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा आरोप करत भाजपने या पुस्तकावर बंदी लावण्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात आज पहिले अमरावती येथे पोलीस आयुक्त्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नागपुरात पत्रकार परिषद घेत भाजपने या पुस्तकावर कारवाईची मागणी केली.

शिवरायांचा पुतळा हटवला तिथेच पुन्हा स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ स्वत: हजर राहणार

शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव असं या पुस्तकाचे शीर्षक असून मुळात तेच आक्षेपार्ह असल्याचा दावा भाजपने केला आहे. शिवाय पुस्तकात अनेक उपशीर्षक छत्रपतींचा अवमान करणारे आणि राज्यातील विविध जातींमध्ये तेढ निर्माण करणारे असलत्याचा आरोपही कुलकर्णी यांनी केला आहे. या पुस्तकात लेखकाने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असून लेखक शिवाजी महाराजांच्या बद्दल तुच्छभाव दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एवढंच नाही तर पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणाचे शीर्षक शिवाजीच्या महानतेचा बागुलबुवा असा आहे. तर शिवाजीचा फुगा कुणी व का फुगवला असे उपप्रकरण सुद्धा या पुस्तकात असल्याचे कुलकर्णी म्हणाले.

विनायक मेटेंचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

आतील पानात पुस्तकातील अनेक उपशीर्षक अतिशय आक्षेपार्ह आहेत. एका उपशीर्षकात हिंदू शब्दरूपी बाटलीत शिवाजी नामक दारू असे शब्दप्रयोग करून महाराजांचा अवमान करण्यात आल्याचे कुलकर्णी म्हणाले. आम्ही या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र पाठवले असून 19 फेब्रुवारीच्या आत म्हणजेच शिव जयंतीच्या आत पुस्तकावर बंदी घालून लेखक आणि प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ही शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.

मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचं भाजप कार्यालयात प्रकाशन, शिवभक्तांमध्ये रोष

पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना -
काही दिवांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणाऱ्या पुस्तकामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे या पुस्तकाचं नाव होतं. दिल्ली भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले होते. 12 जानेवारी भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं होतं. दरम्यान, शिवप्रेमींच्या संतापानंतर हे पुस्तक मागे घेण्यात आले.

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांवर लवकरच हॉलिवूडपट | ABP Majha