नागपूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या पक्षात दम राहिला नाही. म्हणून त्यांना बाहेरुन लोक आणावे लागतात, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. ते नागपुरात (Nagpur) बोलत होते. अंबादास दानवे यांनी नागपुरात झालेल्या (Nagpur Rain) अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shiv Sena) यांची शिवसेना यांच्यावर घणाघात केला. 


अंबादास दानवे म्हणाले, "आता एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिमा सुधारू शकत नाही. यांची प्रतिमा काही राहिलीच नाही, आता ती काय सुधारणार? उलट यांनी महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवली आहे यांना 50 खोके (50 Khoke) म्हणून आता ओळखले जाते"


बावनकुळेंच्या पक्षात दम राहिला नाही


या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नागपुरात जाऊन हल्ला चढवला. "बावनकुळे यांच्या पक्षात दम राहिला नाही. म्हणून त्यांना बाहेरून लोक आणावे लागत आहे. इनकमिंग कोणाला करावे लागते, ज्यांच्या पक्षात चांगल्या नेतृत्वाचा अभाव असतो", असं दानवे म्हणाले. 


आमदार अपात्रताप्रकरणात वेळकाढूपणा


यावेळी अंबादास दानवेंनी आमदार अपात्रप्रकरणावरही भाष्य केलं. "आमदार अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात बिलकुल समाधानी नाही. याप्रकरणात वेळकाढूपणा केला जात आहे. दबाव आणून सुनावणी घेतली जात आहे. अध्यक्षांना हाताशी धरुन काम केले जात आहे. पुन्हा एकदा हक्कभंग आणला, तरी मी घाबरणार नाही" असा निर्धार दानवेंनी केला.  


पत्रकारांवरील विधानावरुन बावनकुळेंवर टीका


दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगरमध्ये पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला होता. याबाबतची ऑडिओ क्लिप समोर आली. त्यानंतर विरोधकांनी बावनकुळेंवर निशाणा साधला.


अंबादास दानवेंकडून पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी


विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अंबाझरी लेआऊट येथे पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. दानवेंनी काही कुटुंबीयांशी बोलून संवादही साधला. "अनेक घरातील कुटुंबियांना स्थलांतरित व्हावं लागलं, भयावह परिस्थिती होती, नियोजनाचा अभावचा विषय दिसतोय, मोठ्या घोषणा होत्या, पण काम होत नाही", असं दानवे म्हणाले. 


भिंती खिळखिळी झाल्या आहेत. काम करताना टप्प्या टप्प्यात काम झालं पाहिजे. एक टक्का पूर्ण करून बाकीचे काम झाले, मोठी दुर्घटना होण्याची वाट महानगरपालिका पाहत होते का? दिल्ली मुंबईत अशा पद्धतीने मोठं मोठ्या गप्पा मारत आहेत हे नागपूरकरांचे दुर्दैव आहे, असा घणाघात दानवेंनी केला. 
 


संबंधित बातम्या