Ambadas Danve on Dharavi Redevelopment : मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या (Dharavi Redevelopment)  मुद्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ((Ambadas Danve)) आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जोरदार घोषणाबाजी करत विधान भावनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. अदानीला आंदण देण्याचे काम सरकार करत आहे. मुंबई आणि त्यातल्या त्यात धारावीमध्ये हजारो लघु उद्योग आहेत. तेथील लोक पूर्णपणे या उद्योगावर अवलंबून असतांना ही धारावी अदानीच्या घश्यात घालण्याचे काम  राज्य सरकार करत आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खाते बदल होत असतांना शेवटच्या दिवशी धारावीच्या सर्व टेंडरवर सह्या केल्या आहे. जवळ जवळ धारावीच्या 70 हजार लोकांना घरे मिळतील की नाही ही शंका आहे. असे असतांना TDR ची मालकी आदानीकडे दिली जाते. सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे, की आदानीचे दलाल आहे? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. ते नागपुरात बोलत होते.

  


अदानी-मोदानी हटाव, धारावी बचाव


मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्याला विरोध दर्शवत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधान भावनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी अदानी-मोदानी हटाव, अदानीला सुटलीय धारावीची हाव, धारावीकर म्हणताय अदानी चले जाव!, आज धारावी, उदया मुंबई,  धारावी वाचवा, लघु उद्योग वाचवा, आदानीला सूट, धारावीची लूट अशा आशयाचे बॅनर झळकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज धारावीमध्ये हजारो लोक लघु उद्योग करत आहे.  धारावी पुनर्विकासाच्या नावावर सरकार आदानीच्या फायद्याचे काम करत असून येथील जनतेवर अन्याय करत आहे.  म्हणून या मुद्यावर आम्ही विधान भवनाच्या आत आणि बाहेर आमच्या लढा देत आहोत. दोन्ही सभागृहात या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातील आणि धारवीकरांना न्याय मिळवून दिला जाईल. असे अंबादास दानवे म्हणाले. 


 


सरकार हे आदानीचे दलाल आहे का ? - अंबादास दानवे 


 केंद्र सरकार मोदी-शाहच्या नेतृत्वात मुंबईवर अन्याय करत आहे. तसेच राज्यातले खोके सरकार, गद्दार सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे. त्यामुके धारावी आणि मुंबईवर होणार अन्याय महाविकास आघाडी कधीही सहन करणार नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या आता आणि बाहेर देखील आम्ही लढा देण्याचा निर्धार केला आहे. सरकार हे जनतेचे काम करण्यासाठी आहे, की आदानीचे दलाल म्हणून काम करत आहे ? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. 


ही बातमी वाचा: