नागपूर: जळालेले बॉयलर दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने आरे शासकीय दूध डेअरीचे दूध संकलन व वितरण जून महिन्यांपासून बंद झाले आहे. वर्धा येथील डेअरीचे बॉयलर चार जूनला जळाले होते. मात्र दहा ते बारा दिवस अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे दूध वितरण व संकलनही आपसूकच बंद झाले. त्यानंतर माजी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन त्यांच्या कनावर हा प्रकार घालण्यात आला. केदार यांच्या पत्रानंतर थोडी हालचाल सुरू झाली. 28 जूनला बॉयलर दुरुस्त करण्यात आले. यात तब्बल 23 दिवस अधिकाऱ्यांनी घालविले. त्यामुळे शेतकरी व दूध संघांनी खाजगी डेअरीला दुधाची विक्री करणे सुरू केले. आता आरेला दूध द्यायला कोणी तयार नाही.
Nagpur Municipal Corporation : सोशल मीडियावर मनपाची फक्त चमकोगिरी, नागरिकांच्या तक्रारी न सोडवताच 'क्लोज'
बॉलयर जळाल्याने वर्धा डेअरीला मिळणारे दूध चंद्रपुर डेअरीला देणे आवश्यक होते. तेसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे चंद्रपूरची डेअरीसुद्धा बंद पडली. दर महिन्याला नियमित वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांना दूध आले काय किंवा नाही आले यामुळे काही फरक पडत नाही. असा प्रकार येथेही घडला. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांचे कामच दुधाचे उत्पादन वाढवणे, सोसयाट्यांना परवानगी देणे व त्यांच्यामार्फत शासकीय डेअरींसाठी दूध पुरवठा करणे आहे. अशा कामचुकार पगारी अधिकाऱ्यांमुळे शासकीय दूध डेअरीला दूध मिळत नाही. अशा अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी आणि याचा जाब विचारावा अशई मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव मंडळांसाठी कलाकारांचे नि:शुल्क सांस्कृतिक कार्यक्रम
निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात
नागपूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जमाती युवक-युवतींसाठी 18 दिवसांच्या नि:शुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. गुरुनानक कॉलेज कळमेश्वर येथे होत असलेले हे प्रशिक्षण उद्योग संचालनालय, उद्योग विभाग, मुंबई व मिटकॉन लि. पुणे यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मंचावर गुरुनानक इन्स्टिट्युटचे प्राचार्य डॉ. सुधिर शेळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश शेराम, मिटकॉनचे उपाध्यक्ष राजेश मिश्रा, मिटकॉनचे मुख्य प्रशिक्षक सोनाली मिश्रा, गुरुनानक इन्स्टिट्युटचे रजिस्टार डॉ. नंदकिशोर सवाई, प्रकल्प प्राध्यापक डा.उन.एस.रामन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिटकॉनचे उपाध्यक्ष राजेश मिश्रा व आभार प्रदर्शन मुख्य प्रशिक्षक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.