नागपूर: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेअंतर्गत तिसऱ्या मार्गिकेच्या कामामुळे सोमवार, 1 ऑगस्टपासून 48 तासांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे 28 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे ऑगस्ट महिना सुरू होताच रायपूर-बिलासपूर मार्गावर प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. 


Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 830 कोरोना रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर


या गाड्या रद्द


(08743) गोंदिया - इतवारी मेमू पॅसेंजर स्पेशल, (08744) इतवारी - गोंदिया मेमू, (08267) रायपूर - इतवारी पॅसेंजर स्पेशल, (18239) कोरबा - इतवारी एक्सप्रेस, (08741) दुर्ग - गोंदिया मेमू, (08741) दुर्ग - गोंदिया MEMU, (0874) दुर्ग , (18240) इतवारी-बिलासपूर एक्सप्रेस, (12855) बिलासपूर-इतवारी इंटरसिटी, (18109) टाटा-इतवारी एक्सप्रेस 1 आणि 2 ऑगस्ट रोजी रद्द राहतील. याशिवाय (08268) इतवारी-रायपूर पॅसेंजर, (12856) इतवारी-बिलासपूर इंटरसिटी, (18110) इतवारी-टाटा एक्सप्रेस 2 आणि 3 ऑगस्ट रोजी रद्द राहतील. त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट (11754) रीवा-इतवारी, (18030) श्यामली-एलटीटी, (18029) एलटीटी-श्यामली, (12808) निजामुद्दीन-विशाखापट्टणम, (12410) गोंडवाना एक्स्प्रेस, (18238) छत्तीसगड-208 एक्स्प्रेस, (18238) छत्तीसगढ-2043, सिंह की कोठी, (12771) सिकंदराबाद-रायपूर, (12767) नांदेड संत्रागाछी एक्स्प्रेस धावणार नाही. 2 ऑगस्ट रोजी (11753) इतवारी-रीवा एक्सप्रेस, (12807) विशाखापट्टणम निजामुद्दीन, (18237) छत्तीसगड एक्सप्रेस, (12772) रायपूर-सिकंदराबाद रद्द राहतील. 3 ऑगस्टला (12409) गोंडवाना एक्स्प्रेस, (12768) संत्रागाछी-नांदेड या मार्गावर धावणार नाही, तर 4 ऑगस्टला (20844) भगतसिंग की कोठी-बिलासपूर एक्स्प्रेस रद्द राहील.


RBI Repo Rate : ईएमआय महाग होणार? आरबीआय रेपो दर वाढवण्याची शक्यता