मुंबई :   राज्यात आज  830 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1024  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे  मुंबई जिल्ह्यातील आहे. 


एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू


राज्यात आज एका  कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,87,372 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 12808 सक्रिय रुग्ण


राज्यात एकूण 12808 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 3737   इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1889   सक्रिय रुग्ण आहेत. 


मुंबईत सोमवारी 164 रुग्णांची नोंद


मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 164 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 176 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,03,437 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. 


देशात 16 हजार 464 नवीन कोरोनाबाधित


 गेल्या काही दिवसामध्ये वाढत असलेला कोरोनाचा आलेख किंचित घटला आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. रविवारी दिवसभरात देशात 16 हजार 464 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या एक लाख 43 हजार 989 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासांत 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 5 लाख 26 हजार 396 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. रविवारी 16 हजार 112 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून 4 कोटी 33 लाख 65 हजार 890 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.