RBI Repo Rate : ईएमआय महाग होणार? आरबीआय रेपो दर वाढवण्याची शक्यता

RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आरबीआयची 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान पतधोरण बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

RBI Repo Rate :  तुमच्या कर्जावरील व्याज दर आणखी वाढवण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक रेपो दरात (RBI Repo Rate )वाढ करण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान पतधोरण आढावा बैठक पार पडणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत महागाईसह इतर बाबींवर विचार विनिमय केला जाणार असून रेपो दर जाहीर होणार आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत आरबीआय रेपो दरात 25 ते 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते. 

याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला.  त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यानंतर आता 5 ऑगस्ट रोजी आरबीआय रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याची शक्यता आहे. 

>> रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

>> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola