एक्स्प्लोर

पुरवणी मागण्यांवर मतदानाच्या मागणीची विरोधकांची हुल आणि सत्ताधाऱ्यांची उडाली धावपळ

सभागृहात तळ ठोकून बसणाऱ्या अजित पवारांनी मग आलेल्या नवख्या आमदारांची शाळा घेतली तर काही ज्येष्ठ आमदारांना आल्याबद्दल हात जोडून आभार मानले. यामुळे विधानभवनातील वातावरण एकमेकांना चिमटे आणि टोले देताना चांगलेच रंगले होते.

नागपूर : आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेनंतर विरोधक मतदान मागू शकतात या शक्यतेमुळे सत्ताधारी आमदारांची चांगलीच धांदल उडाली. आज सकाळपासून विधानसभेत पुरवण्या मागण्यांवर चर्चा सुरू आहे. संध्याकाळी 6 वाजता राज्यपालांच्या चहापानाच्या नियोजित कार्यक्रमासाठी साडे सात पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र पुन्हा सभागृहात येण्याऐवजी अनेक आमदारांनी काढता पाय घेतला आणि सत्ताधाऱ्यांची संख्या रोडावली. बेसावध सत्ताधाऱ्यांचा अंदाज घेत विरोधकांनी पुरवण्या मागण्या मान्य करण्यापूर्वी मतदानाची मागणी करण्याची तयारी केली होती. अशा स्थितीत जर सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ कमी असते तर प्रस्ताव फेटाळण्यात आला असता. तसेच सरकार अल्पमतात येण्याचा धोका निर्माण झाला असता. याची जाणीव होताच सत्ताधारी पक्षातील गट नेते आणि प्रतोदांना त्यांच्या आमदारांना तात्काळ सभागृहात हजर राहण्याच्या सूचना धाडल्या. त्यानंतर इकडे तिकडे पांगलेले सत्ताधारी आमदार सभागृहात हजेरी लावण्यासाठी पळत येताना पाहायला मिळाले. सभागृहात तळ ठोकून बसणाऱ्या अजित पवारांनी मग आलेल्या नवख्या आमदारांची शाळा घेतली तर काही ज्येष्ठ आमदारांना आल्याबद्दल हात जोडून आभार मानले. यामुळे विधानभवनातील वातावरण एकमेकांना चिमटे आणि टोले देताना चांगलेच रंगले होते. हे ही वाचा-  मोर्चेकरी दहा तर सुरक्षेला 35 पोलीस, मटणाच्या हमी भावासाठी असाही एक लक्षवेधी मोर्चा काही वेळातच सत्ताधारी बाकावर आमदार फुल्ल मेजोरीटीत हजर झाले तर विरोधकांपैकी फक्त भाषणापुरतेच आमदार असे चित्र दिसले. त्यामुळे विरोधकांच्या फक्त मतदानाच्या हुलने बेसावध सत्ताधाऱ्यांची एकच धावपळ उडालेली आज विधानभवनात पाहायला मिळाली. दरम्यान, विधानसभेत पुरवण्या मागण्या बहुमताने संमत झाल्या. आम्ही व्हीप काढला होता म्हणून आमदार धावपळ करत आले. त्यांना व्हीपचं महत्व माहिती आहे. आमच्यावर असा बेसावध वार कोणी करू शकत नाही, असे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू म्हणाले. तर आम्ही सत्ताधारी अलर्ट आहोत. कुठल्याही मतदानाला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत. विरोधक काय प्रस्ताव फेटाळणार, जनतेने त्यांना फेटाळलंय. आता तर आमचा बहुमताचा आकडा 170 आहे. हळू हळू बघा आम्ही 190 पार करू, असे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. पुरवणी मागण्यांच्या चर्चेमधे मांडलेल्या मुद्यावर सरकारकडून उत्तर न आल्यामुळे भाजपचा सभात्याग तर पुरवणी मागण्यांच्या चर्चेमधे मांडलेल्या मुद्यावर सरकारकडून उत्तर न आल्यामुळे भाजपकडून सभात्याग करण्यात आला. आरेमधे निवासी झोन करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली. हा भूखंड हडप करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदारांनी केला होता त्याचे कोणतेही उत्तर सरकारने दिले नाही याचा अर्थ हा भूखंड हडप करण्याच डाव आहे असा होतो. भाजपने त्याचा निषेध केला. राज्यातील मच्छीमारांचे अवकाळी पाऊस आणि वादळांमुळे नुकसान झाले आहे त्यांना मदत द्या अशी मागणी भाजपने केली होती त्याबद्दल कोणतेही उत्तर सरकारने दिले नाही. फ्रि होल्ड प्राँपर्टी करताना घेण्यात येणारा कर हा 10 टक्के ऐवजी 1 टक्के घेण्यात यावा. या तीन मुद्द्यावर उत्तरे न आल्याने सभात्याग करण्यात आला असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले आहे. हे ही वाचा - मोर्चेकरी दहा तर सुरक्षेला 35 पोलीस, मटणाच्या हमी भावासाठी असाही एक लक्षवेधी मोर्चा

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 2nd T20 : गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
Trigrahi Yog 2026 : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Sudhakar Kohale: गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, निराश झाल्यावर त्यातून बाहेर काढणारे ज्येष्ठ नेते; पण...; नागपूर भाजपातील बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले
नागपुरातील भाजपच्या बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले, म्हणाले, गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, पण....
AB De Villiers : जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं
जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Embed widget