एक्स्प्लोर

पडद्यामागचं अधिवेशन | नागपूर अधिवेशनात आज इंटरेस्टिंग काय घडलं

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज चहापानाने सुरुवात झाली. पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदा चांगल्याच गाजल्या. या व्यतिरिक्त अनेक किस्से, घडामोडी पडद्यामागे रंगल्या.

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज चहापानाने सुरुवात झाली.  पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदा चांगल्याच गाजल्या.  हे अधिवेशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासाठी पहिलं अधिवेशन. सोबतच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीचं हे तीन चाकांचं सरकार घेऊन त्यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा सामना करायचा आहे. मात्र या निमित्ताने अनेक मजेशीर किस्से देखील या राजकीय आखाड्यात घडतात. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अनेक किस्से, घडामोडी पडद्यामागे रंगल्या. अजित दादांच्या 'सुटा-बुटा' ची चर्चा ज्यात सर्वात जास्त चर्चा रंगली ती अजित पवारांच्या डॅशिंग लूकची सायंकाळी चहापानच्या वेळी सर्व नेते मंडळी हळूहळू जमायला लागली. त्यात अजित दादांची एन्ट्री आणि सर्वजण एकमेकांकडे बघायला लागले कारण आज अजित पवार हे नेहमी पेक्षावेगळे दिसत होते डोळ्यावर गाॅगल लावला असता तर बाॅलिवूड, हाॅलिवूड आणि टाॅलिवूडच्या सर्वच हिरोंना दादांनी मागे टाकलं असतं अशी चर्चा रंगली. चहापान संपल्यावर अनेकांनी दादांसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. मी ही मिश्किलपणे विचारलं दादा आज एकदम हिरो दिसतायत तर मला म्हणाले 'थंडीमुळे कोट घातला आहे. नागपुरात पाय ठेवताच ' ठाकरे' जोशात आखाड्यात पैलवानाला चितपट केल्यानंतर विजयी पैलवान पुन्हा त्याच्याच घरच्या आखाड्यात खेळायला उतरतो तसंच काही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं झालं होतं. नागपूरच्या सुपुत्राला चितपट केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे नागपूरात दाखल झाले होते. त्यामुळे स्वभाविक उद्धव ठाकरेंमध्ये वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. मंत्री नितीन राऊत आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं जल्लोषात स्वागत केलं. नागपूर विमानतळावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. सोबतीला ढोल ताशे आणि झेंड्यांची जोड होती. देवेंद्र फडणवीसांना मात दिल्यानंतर नागपूरच्या भूमीत पाय ठेवताना उद्धव ठाकरेंचा उत्साह मोठा दिसला पत्रकार परिषदेतही जास्त गोलगोल उत्तरं न देता थेट सरळ आणि स्पष्टपणे उत्तर दिली. कदाचित नागपूरच्या जुन्या मित्रांना हा आत्मविश्वास त्यांना दाखवायचा होता की काय म्हणून आज उद्धव ठाकरे उत्साहात दिसले. नागपुरात 'नार्वेकरांचा' वेगळाच स्वॅग उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर याचंही पहिलंच नागपूर अधिवेशन. त्यामुळे नागपूरच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. नागपूर विमानतळापासून ते विधानभवनापर्यंत मिलिंद नार्वेकराचे होर्डिंगवर फोटो होते.  मंत्रिमंडळाचा विस्तार जवळ आलाय. अनेकांनी लाॅबिंग सुरु केलीय त्यात नार्वेकरांची पक्षातली ताकद सर्वच जाणतात.  त्यामुळे नागपूरात नार्वेकरांच्या अवतीभोवती खूप लोकं दिसतायत फडणवीसांची चर्चा देवेंद्र भाऊंचा अतिआत्मविश्वास नडला नाहीतर आज ते आमच्या सोबत असते, अशी भावना शिवसेनेच्या काही लोकांमध्ये होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यांवरून शिवसेनेला अडकवण्याचा प्रयत्न देवेंद्र भाऊ करतायत. पण ते शक्य नाही. कारण आता त्याचा काहीही फायदा होणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेत उमटताना दिसली. शिवाय सत्तेशिवाय फडणवीस एकटे पडल्याची चर्चा शिवसेनेत जास्त होती. अधिवेशनातल्या पुढच्या काही दिवसांत देवेंद्र भाऊ आक्रमक होऊन शिवसेनेला अंगावर घेणार असंच चित्र दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत घडामोडींना वेग, युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, CJPची ट्वीट करुन माहिती
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत घडामोडींना वेग, युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, CJPची ट्वीट करुन माहिती
Abhijeet Dipke Detained By Delhi Police: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड झालं, पण दिल्ली पोलीस डायरेक्ट विमानात घुसले अन्... दिपके पोलिसांच्या ताब्यात
अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड झालं, पण दिल्ली पोलीस डायरेक्ट विमानात घुसले अन्... दिपके पोलिसांच्या ताब्यात
Akola News: अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
Suryakumar Yadav : टीव्हीसमोर एकटाच बसून पुटपुटत होता सूर्यकुमार यादव; पत्नीने गुपचूप कॅमेरा ऑन केला अन्... IND vs WI मॅचमधील स्ट्रॅटेजी ऐकून सगळेच चक्रावले, पाहा VIDEO
टीव्हीसमोर एकटाच बसून पुटपुटत होता सूर्यकुमार यादव; पत्नीने गुपचूप कॅमेरा ऑन केला अन्... IND vs WI मॅचमधील स्ट्रॅटेजी ऐकून सगळेच चक्रावले, पाहा VIDEO

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Embed widget