एक्स्प्लोर

Kargil Vijay Din : शहिदांच्या वीर पत्नींना उद्योग व्यवसायात जिल्हा प्रशासनाची साथ

महिला भगिनींसाठी प्रशिक्षणापासून तर आवश्यक वस्तूंच्या निर्मितीपर्यंत सर्व क्षेत्रात जिल्हा प्रशासनाला मदत करता येईल. जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यासाठी मदत करेल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

नागपूर : शहिदांच्या वीर पत्नींना वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशिक्षण व उद्योग व्यवसाय करण्याची आवश्यकता बघून हवी ती मदत करायला जिल्हा प्रशासन तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे केले. 23 व्या कारगिल विजय दिवसाच्या पर्वावर शहिदांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित परिवारांशी त्यांनी संवाद साधला. नागपूर येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सैनिकी मुलांच्या वसतिगृहात कारगिल स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकावर पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांनी या ठिकाणी जमलेल्या सैनिकांच्या परिवाराशी चर्चा केली. यावेळी त्यांनी श्रद्धांजली सभेमध्ये भाग घेतला. जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रस्तावावर सकारात्मक भूमिका

यावेळी शहीद वीर मातांशी चर्चा करताना त्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत या संदर्भात आलेल्या प्रस्तावावर अतिशय सकारात्मकपणे जिल्हा प्रशासन प्रतिसाद देईल, असे आश्वासन दिले. सगळ्यांनी एकत्रित येऊन नव्या कोणत्या गोष्टी करता येतात या संदर्भातला विचार करावा. महिला भगिनींसाठी प्रशिक्षणापासून तर आवश्यक वस्तूंच्या निर्मितीपर्यंत सर्व क्षेत्रात जिल्हा प्रशासनाला मदत करता येईल. जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यासाठी मदत करेल असेही त्यांनी सांगितले.

20 लाखांचा धनादेश सुपूर्द

यावेळी 'बॅटल कॅज्युअलिटी रिपोर्ट' वरून रामटेक तालुक्यातील चिचाळा येथील निलेश धरम दमाहे या जखमी जवानाला वीस लक्ष रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. हा जवान सध्या डेहराडून येथे कार्यरत आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्करी कारवाईदरम्यान या जवानाला दुखापत झाली होती. देशांतर्गत सुरक्षा संबंधी कारवाई मोहिमेत सहभागी असताना ही दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना 20 लाखाचा सानुग्रह निधी आज देण्यात आला. जवानाची पत्नी व त्यांच्या आईने हा धनादेश स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी जवानाची पत्नी व आई यांच्याशी हितगुज साधले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने नागपूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर (निवृत्त), सैनिक कार्यालयातील कर्मचारी, माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
गॅस सिलेंडरमध्ये गॅस नाही तर निघाले तब्बल 4 लिटर पाणी, इंडेन गॅसवर ग्राहकाचा गंभीर आरोप, लातूर जिल्ह्याती घटना
गॅस सिलेंडरमध्ये गॅस नाही तर निघाले तब्बल 4 लिटर पाणी, इंडेन गॅसवर ग्राहकाचा गंभीर आरोप, लातूर जिल्ह्याती घटना

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget