Munjya Box Office Collection Day 11 : मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित चित्रपट 'मुंज्या' (Munjya) बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्यातही धुमाकूळ घालणार असल्याची चिन्हे दिसत आहे. रिलीजच्या दुसऱ्या सोमवारी ईद आल्याचा फायदा 'मुंज्या'ला झाला आहे. ईदच्या दिनी 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या आठवड्याच्या आतच 'मुंज्या'ने आपलं बजेट वसूल केले असून आता त्याहून अधिक कमाई करत आहे.
'मुंज्या'ने ईदच्या दुसऱ्या दिवशी किती केली कमाई?
'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर रोज कमाल करत आहे. कोणत्याही मोठ्या स्टार कलाकाराशिवाय चित्रपट प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यास यशस्वी झाला आहे. 'मुंज्या' आता दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे.
'मुंज्या'ने 4 कोटी रुपयांचे खाते उघडले होते आणि पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 35.3 कोटींची कमाई केली होती. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या शुक्रवारी 'मुंज्या'ने 3.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाने 6.5 कोटी, तर दुसऱ्या रविवारी 'मुंज्या'ने 8.5 कोटींचा गल्ला जमवला. आता चित्रपटाच्या रिलीजच्या 11व्या दिवशी दुसऱ्या सोमवारच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सोमवारी प्राथमिक अंदाजानुसार, 'मुंज्या'ने 4.35 कोटींचा गल्ला जमवला. 'मुंज्या'ने आता बॉक्स ऑफिसवर जवळपास 60 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 53.80 कोटी रुपयांची कमाई करून सगळ्यांच धक्का दिला आहे. यासोबतच या चित्रपटाने अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या 'मैदान' या चित्रपटाचा 53.03 कोटी रुपयांच्या कलेक्शनचा रेकोर्ड ही मोडला आहे.
'भेडिया' युनिव्हर्सचा हिस्सा...
या चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीन्समध्ये वरुण धवन आणि अभिषेक बॅनर्जी दिसले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कथा आता इतर चित्रपटाच्या कथेशी कनेक्ट असू शकते. त्यामुळे आता भेडिया अथवा 'मुंज्या' चित्रपटाचा पुढे कोणता भाग आला तर तो चित्रपट समजण्यास अडचण येऊ नये यासाठी देखील अनेकजण 'मुंज्या' पाहण्यास जात आहे. ''मुंज्या'' हा 'भेडिया' युनिव्हर्सचा एक भाग असल्याच्या चर्चेचा फायदा मिळत आहे.