मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. तो फोटो 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी काढलेला आहे. झिशान सिद्दिकी यांनी वडिलांबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर 12 ऑक्टोबरला  मुंबईतील वांद्रे पूर्व मध्ये गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 14 जणांवर अटकेची कारवाई केली आहे.


झिशान सिद्दिकींच्या पोस्टमध्ये काय?


5 वर्षांपूर्वीच्या निकालाच्या दिवसाचा फोटो शेअर करत 'हा क्षण तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे शक्य झाला', असं झिशान सिद्दिकी म्हणाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आणि वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी एक्स प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट केली.पाच वर्षांपूर्वीच्या 24 ऑक्टोबर या दिवशीचा बाबा सिद्दीकींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.


"तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे क्षण शक्य झाले ते या फोटोत कैद झाले होते,  बाबा, मला रोज तुझी आठवण येते", असं झिशान सिद्दिकी म्हणाले.


पाच वर्षापूर्वी निकालाच्या दिवशी या क्षणाचा फोटो काढला गेला होता. तुमची कठोर मेहनत आणि माझ्यावरील विश्वासामुळं ते शक्य झालं होतं. तुम्ही आता निघून गेलात, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं बळ अनुभवतोय, तुम्ही त्यांच्यासाठी केलेलं काम आणि समर्पण हे देखील अनुभवतोय. तुमची रोज आठवण येते, असं झिशान सिद्दिकी म्हणाले.


झिशान सिद्दिकी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यावेळी देखील उतरणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 






बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी 14 जणांना अटक


बाबा सिद्दिकी यांच्यावर दसऱ्याच्या दिवशी गोळीबार करण्यात आला होता. बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणाऱ्यांपैकी गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप या दोघांना घटनास्थळावरुन अटक करण्यात आली. यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी प्रविण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर, हरियाणातून अमित कुमार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक करण्यात आली आहे. 


इतर बातम्या :


श्रद्धा की निष्ठा... सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली; लालबागच्या राजाचरणीची 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत