एक्स्प्लोर

पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी राम कदम यांचा फोन, युवासेनेचं आज मुंबईत आंदोलन

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी राम कदम यांनी पोलिसालाच फोन केल्याचं समोर आल्यानंतर युवासेनेने आज मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी अडीच वाजता आंदोलन करणार आहे.

मुंबई : पोलिसांला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसालाच फोन करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. राम कदम यांनी आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांना फोन करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज युवासेनेने मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी अडीच वाजता आंदोलन करणार आहे.

मुंबईतील पवई पोलीस स्टेशनचे कर्मचारी नितीन खैरमोडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अमानुष मारहाण केली. दिपू तिवारी, सचिन तिवारी आणि आयुषा राजभर अशी आरोपींची नावं आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक केली. मात्र काही तासांच्या आत आमदार राम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन आरोपींना सोडण्याची विनंती केली. ही बाब समजताच शिवसेनेने राम कदम यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. राम कदम यांच्या निषेधार्थ युवासेना आज मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे.

घाटकोपर पश्चिम स्टेशन रोड, वरळी नाका, दादरमधील शिवसेना भवन, कांदिवली पूर्वेतील शिवसेना शाखा क्र. 24, वांद्र्यातील चेतना कॉलेज, अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक आणि गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकाजवळ ही आंदोलनं होणार आहेत.

काय आहे प्रकरण? पवई हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एक ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणारे भाजपचे कार्यकर्ते धडकले. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभरला ताब्यात घेतले. रिक्षाने जात असताना आरोपींनी नितीन खैरमोडे यांना रिक्षातच मारहाण केली. शिवाय त्यांच्या तोंडावर आणि गालावर हातातील कडे मारले.

राम कदम आणि नितीन खैरमोडे यांच्यातील फोनवरील संभाषण पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक केल्यानंतर काही तासातच राम कदम यांनी नितीन खैरमोडे यांना फोन केला. "त्या दिपूने केलं ते ते चूकच आहे. त्याचं समर्थन करु शकत नाही. अजून त्याचं लग्न पण झालं नाही, करिअर पण सुरु झालेलं नाही. पण आता ज्या पद्धतीचे कोर्टात केस स्टँड झाल्याचे आपण पाहिलेच आहे. त्याच्या दोन थोबाडीत मारा, पण आपसात ही केस सोडवण्याचा प्रयत्न करा," असं राम कदम नितीन खैरमोडे यांना म्हणाले. परंतु आरोपींनी मला आई-बहिणींवरुन शिव्या दिल्या. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर चुकीचा संदेश समाजात जाईल, त्यामुळे आरोपींना शिक्षा व्हावी ही माझी इच्छा आहे," असं सांगत खैरमोडे यांनी तक्रार मागे घेण्यास नकार दिला.

पोलिसांन मारहाण करणाऱ्यांना सोडा म्हणणं दुर्दैवी : एकनाथ शिंदे दरम्यान, शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, "कोविड काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरुन काम केलं. यात कितीतरी पोलीस शहीद झाले. असं काम करणाऱ्या पोलिसांना मारहाण केली जाते. मारहाण करणाऱ्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे कृत्य निषेध करण्यासारखं आहे. मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचं संरक्षण पोलीसच करतात आणि त्यांना मारहाण करणाऱ्यांना सोडा असं म्हणणं हे दुर्दैवी आहे."

Mumbai Police | पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी राम कदमांचा पोलिसांनाच फोन 

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget