एक्स्प्लोर

पगारवाढीसाठी तरुणाचं दूरदर्शन टॉवरवर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन

पगारवाढीसाठी तरुणाने दूरदर्शन टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. 'मीडिया बोलवा तरच खाली येईन नाहीतर जीव देईन', अशी धमकीही तरुणाने यावेळी दिली.

मुंबई : पगारवाढीसाठी तरुणाने दूरदर्शन टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. 'मीडिया बोलवा तरच खाली येईन नाहीतर जीव देईन', अशी धमकीही तरुणाने यावेळी दिली. मुंबईतील वरळी येथील दूरदर्शन कार्यालय परिसरात शुक्रवारी हा सगळा ड्रामा घडला.

अजय पासवान असं आंदोलनकर्त्या तरुणाचं नाव आहे. चार तासांच्या ड्राम्यानंतर तरुणाला खाली उतरविण्यात पोलिसांना आणि अग्निशमन दलाला यश आलं.

अजय शुक्रवारी दूरदर्शन टॉवरवर चढला होता. टॉवरवर चढून त्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत 'माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मी जीव देईन', अशी धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचरण करण्यात आलं. अनेकदा समजावण्याच प्रयत्न करुनही अजय खाली उतरण्यास तयार नव्हता.

'मी खासगी कंपनीत वाहन चालक आहे. मला पगारवाढ हवी आहे. माझे म्हणणे मीडियासमोर आले पाहिजे', असं अजय बोलत होता. अजयच्या मागणीवरुन अग्निशमन दलाने दूरदर्शन कार्यालयातून कॅमेरा आणि माईक मागवला. अजयचे म्हणणे शूट करत असल्याचं त्याला भासविण्यात आलं. अखेर मागण्याची ध्वनिफीत ऐकवल्यानंतर अजय खाली येण्यास तयार झाला.

अजय पासवान एका खासगी कंपनीत चालक म्हणून कार्यरत आहे. त्याचा पगार रखडला असून पगारवाढही होत नाही. म्हणून सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
Video: 'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
Solapur : सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
Pimpri Chinchwad Mahavitaran blast: पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित
पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने
Gold and Silver Purity Test : सोने-चांदीची खरेदी करण्यापूर्वी डाऊनलोड करा 'हे' ॲप; काही मिनिटांतच तपासा शुद्धता, जाणून घ्या सोपी पध्दत
सोने-चांदीची खरेदी करण्यापूर्वी डाऊनलोड करा 'हे' ॲप; काही मिनिटांतच तपासा शुद्धता, जाणून घ्या सोपी पध्दत
Embed widget