बीड : परळी रेल्वे स्थानकावर मस्करीत तोंडात सुतळी बॉम्ब धरुन पेटवला आणि तो फुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हैदराबाद पूर्णा रेल्वेमध्ये ही घटना घडली. सुतळी बॉम्ब फुटल्याचा आवाज इतका जोरात होता की ट्रेनच्या डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. जखमी तरुणाला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा - मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकावर बॉलिवुडची क्वीन फाडणार प्रवाशांची तिकीटं!

सय्यद आक्रम, असं गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. पूर्णा हैदराबाद ट्रेनमधून आपली आई आणि बहिणीसोबत प्रवास करत होता. ट्रेन परळी रेल्वे स्थानकादरम्यान आल्यानंतर सय्यद टॉयलेटला जाण्यासाठी टॉयलेटमध्ये गेला. दरम्यान, सय्यदने आपल्या तोंडात सुतळी बॉम्ब पकडून तो पेटवला. तो तोंडातच फुडल्यानं सय्यद गंभीर जखमी झाला. रेल्वे डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक बॉम्ब फुटलेला आवाज आल्याने डब्यातील प्रवाशांनी टॉयलेटकडे बघितले. त्यावेळी सय्यद जखमी अवस्थेत आढळून आला. या अपघातात मुलाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.

हेही वाचा - पक्षाघाताशी लढण्यासाठी 'गोल्डन ऑवर' सेवा, इमरजन्सी अॅम्बुलन्सचे डॉक्टर उपचार देणार!

घटना घडल्यानंतर प्रवाशांनी तत्काळ जखमी मुलाला रेल्वेतून खाली आणले. परळी रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला फोन केला. काही वेळातच रुग्णवाहिका रेल्वे स्थानकावर दाखल होत ते जखमी तरुणाला उपचारासाठी घेऊन गेले. सध्या या तरुणावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. जखमी सय्यद आक्रम हे मूळ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी आहेत. सध्या सय्यदवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, तोंडात फुटलेला सुतळी बॉम्ब त्याच्याकडे कुठून आला? त्याने तो स्वतःहून पेटवला की अनावधानाने पेटला? या गोष्टींचा उलगडा सय्यद ठिक झाल्यानंतरच होणार आहे.

हेही वाचा - नागपुरात ट्रकमधून तब्ब्ल चार कोटी रुपयांची सिगारेट लंपास

नालासोपाऱ्यात फटाक्यामुळे दोन कंपन्यांना भीषण आग | एबीपी माझा