मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवरील सुनावणीच्या कामाकाजाबद्दल मीडियाला माहिती सांगत होते. ते आटोपल्यानंतर सदावर्ते परतण्यासाठी निघाले असता, एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत, वैजनाथ पाटीलने त्यांच्यावर हल्ला केला. बेसावध असलेल्या सदावर्तेंना बचावासाठी वेळच मिळाला नाही. त्याने सदावर्तेंच्या चेहऱ्यावर बुक्के मारले. यात सदावर्तेंचा चष्माही खाली पडला. गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका का केली, असा प्रश्न त्याने शिवीगाळही केली.
सदावर्ते यांच्यासोबत असलेल्या इतर वकिलांनी त्याला बाजूला साधण्याचा प्रयत्न केला. यानंतर इतरांनी त्यालाही चोप दिला. हायकोर्ट परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
दरम्यान, "आरक्षणाविरोधात याचिका केल्यानंतर आपल्याला हजारभर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असून याबाबत भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसंच मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे," असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
दुसरीकडे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजनाथ पाटील कोण आहे?
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा वैजनाथ मुकणे पाटील हा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा गावचा रहिवाशी आहे. गेल्या चार महिन्यापासून तो पुण्याला नोकरीच्या शोधात गेला होता. आई-वडील गावाकडे शेती करतात. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.
हल्ला झाला तो क्षण
प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न : मराठा आरक्षण याचिका समर्थक
प्रसिद्धीसाठी अॅड. सदावर्ते यांचा केविलवाणा प्रयत्न, हल्लेखोर व्यक्ती आमच्याशी संबंधित नाही, असा दावा मराठा आरक्षणाच्या बाजूने याचिका करणाऱ्यांनी केला आहे.
सदावर्तेच जबाबदार : वीरेंद्र पवार
या परिस्थितीसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते स्वत:च जबाबदार असल्याची प्रतिक्रिया मराठा नेते वीरेंद्र पवार यांनी दिली आहे. सदावर्ते याचिका करुन, मीडियामध्ये बोलून हे प्रकरण अधिकच चिघळवत आहेत. आम्ही या तरुणाच्या बाजूने लढू, असंही ते म्हणाले.
सदावर्तेंनी हल्ला घडवून आणला : दिलीप पाटील
तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीच हा हल्ला घडवून आणला, असा आरोप मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिका करणारे दिलीप पाटील यांनी केला आहे.
हल्ला चुकीचा : गिरीश महाजन
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ