एक्स्प्लोर

प्रेम विवाहाच्या वादातून तरुणाची भरदिवसा दगडाने ठेचून हत्या, अंबरनाथमधील थरकाप उडवणारी घटना

विजय नवलगिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचे काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमविवाह झाला होता.

कल्याण : प्रेम विवाह केल्याच्या वादातून एका तरुणाला दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ परिसरात ही घटना घडली आहे. भरदिवसा घडलेला हा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला असून या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात एकच खळबळ उडाली आहे .याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत यामधील जगदीश मूनगर व कालिदास कोळी दोन आरोपीना गजाआड केलं आहे, तर इतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

विजय नवलगिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचे काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमविवाह झाला होता. अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोड आंबेडकर नगर परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये विजय पत्नीसह राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातल्या काही तरुण "तू आमच्या भागातील मुलीशी प्रेम विवाह का केला?" असा सवाल करत त्याला सतत धमकावत होते.


प्रेम विवाहाच्या वादातून तरुणाची भरदिवसा दगडाने ठेचून हत्या, अंबरनाथमधील थरकाप उडवणारी घटना

आज दुपारच्या सुमारास काही तरुण विजयच्या राहत्या घरी गेले. त्यांनी विजयला बाहेर बोलावून त्याला जबर मारहाण केली. इतकेच नव्हे तर काही जणांनी निर्दयीपणे दगडाने मारहाण केली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या विजयला अत्यंत क्रूरपने रस्त्यावर फरफटत नेले. त्यानंतर मारहाणीत गंभीर जमखी झालेल्या विजयचा मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरु असताना एका अज्ञात वाटसरूने हा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित केला आहे. 

घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ शिवाजी नगर पोलिसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहताच आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पळून जात असताना दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Koyna Dam Water Dispute : कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? जाणून घ्या राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
Embed widget