एक्स्प्लोर
मुंबई पालिकेत यशवंत जाधव शिवसेनेचे गटनेते!

मुंबई: मुंबई महापालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून यशवंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची निवड जाहीर केली. यशवंत जाधव तिसऱ्यांदा माझगावमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी यंदा वॉर्ड क्रमांक 209 मधून विजयी झाले आहेत. यशवंत जाधव हे गेल्या 38 वर्षापासून शिवसेनेत आहेत. जाधव यांनी मागील सात वर्ष स्थायी समितीचे सदस्यपद सांभाळलं आहे. त्यामुळं त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्यासाठी गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आल्याचं शिवसेनेनं जाहीर केलं आहे. जाधव हे 1997 साली पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यांनी मुंबई महापालिकेत 7वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद, तसंच स्थापत्य समिती शहर, प्रभाग समिती अध्यक्षपद, बाजार आणि उद्यान समिती अध्यक्षपद भूषविले आहे.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ






















