एक्स्प्लोर

डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या पत्रांचा ऐवज पुस्तक रुपात!

अरविंद जगताप यांनी यावेळी पत्रासोबतच्या आपल्या जुन्या आठणींना उजाळा दिला. पत्र लिहिण्याची आवड महाविद्यालयीन काळापासूनच असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि काही आठवणीही रसिकांना सांगितल्या.

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात काही क्षण डोळ्यांच्या कडा ओल्या करणाऱ्या पत्रांनी तमाम मराठी माणसांच्या काळजाचा ठाव घेतला. लेखक अरविंद जगताप यांच्या हृदयस्पर्शी लेखनातून साकारलेली ही पत्रं आता पुस्तकाच्या रुपात आली आहेत. ग्रंथाली प्रकाशनाने या पत्रांचा संग्रह ‘पत्रास कारण की...’ या पुस्तकाच्या रुपाने प्रकाशित केला आहे. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. दादरमधील किर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ग्रंथालीच्या 43 व्या वाचक मेळाव्यात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अरविंद जगताप यांच्यासह व्यासपीठावर त्यांचे वडीलही उपस्थित होते. त्यासोबत, अभिनेता निलेश साबळे, अभिनेते रमेश भाटकर, सिनेदिग्दर्शक संजय जाधव यांनीही हजेरी लावली. अरविंद जगताप यांनी यावेळी पत्रासोबतच्या आपल्या जुन्या आठणींना उजाळा दिला. पत्र लिहिण्याची आवड महाविद्यालयीन काळापासूनच असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि काही आठवणीही रसिकांना सांगितल्या. डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या पत्रांचा ऐवज पुस्तक रुपात! (लेखक अरविंद जगताप मनोगत व्यक्त करताना) ‘चला हवा येऊ द्या’सारख्या विनोदी कार्यक्रमात पत्राच्या रुपाने पाच ते दहा मिनिटे वातावरण काहीसं गंभीर करणारं पत्र वाचण्याची कल्पना प्रत्यक्षात येऊ दिल्याबद्दल अरविंद जगताप यांनी निलेश साबळेंचे आभार मानले. त्याचसोबत, आपल्या आवाजातील चढ-उतारांचा यथेच्छ वापर करत, रसिकांपर्यंत अगदी अस्सल भिडणाऱ्या भावनांसह शब्द पोहोचवणाऱ्या अभिनेता सागर करंडेचेही आभार मानायला अरविंद जगताप विसरले नाहीत. दरम्यान, मनाला भावणाऱ्या आणि काळजाला भिडणाऱ्या अरविंद जगताप यांच्या पत्रांचा ऐवज पुस्तक रुपाने वाचकांसमोर यावं, अशा भावना अनेकांनी आतापर्यंत व्यक्त केल्या होत्या. डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या पत्रांचा ऐवज पुस्तक रुपात! (प्रकाशन सोहळ्यात पुस्तक विक्री करणारे पोस्टमन काका) पोस्टमन काकांकडून पुस्तक विक्री !       ‘पत्रास कारण की...’ पुस्तकाची विक्रीही हटके पद्धतीने केली जात होती. या प्रकाशन सोहळ्यादरम्यान किर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात एकजण सागर कारंडेप्रमाणे पोस्टमन काकाच अवतरले होते. ते प्रत्येक वाचकाकडे जाऊन पुस्तक खरेदी करण्याबाबत विचारणा करत होते. त्यामुळे हे पोस्टमन काका सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget