एक्स्प्लोर

बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळल्या!

बुंदीच्या लाडूतल्या काजूमधून या अळ्या लाडूत गेल्याची शक्यता असल्याचं सांगत दुकानदाराने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

बदलापूर : एकीकडे वडापावमध्ये पाल सापडण्याचं सत्र सुरु असतानाच, बदलापुरात आता बुंदीच्या लाडूत अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात समोर आलेल्या या प्रकारामुळे ग्राहक चांगलेच धास्तावलेत. वांगणीला राहणारे किरण मेढेकर हे गुरुवारी संध्याकाळी बदलापूरच्या कात्रप भागात राहणारे त्यांचे मित्र शशांक सिनलकर यांच्याकडे येत होते. शशांक यांच्याकडे गणपती असल्यानं त्यांनी प्रसाद म्हणून मधुरम स्वीट्स नावाच्या दुकानातून अर्धा किलो बुंदीचे लाडू घेतले. मात्र घरी गेल्यावर हे लाडू उघडून खात असतानाच त्यात अळ्या असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांनी तडक हे दुकान गाठून दुकानदाराला जाब विचारला. यावेळी लाडूतल्या काजूमधून या अळ्या लाडूत गेल्याची शक्यता असल्याचं सांगत दुकानदाराने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तसंच, दुसरे लाडू घेऊन जाण्यास सांगितलं. यावेळी किरण यांनी या दुकानाचा कारखाना पाहिला असता तिथेही प्रचंड अस्वछ वातावरण दिसून आलं. त्यामुळे या दुकानावर कारवाईची मागणी किरण मेढेकर आणि शशांक सिनलकर यांनी केली आहे. दुसरीकडे, दुकानदाराला याबाबत विचारलं असता तक्रारदार किरण मेढेकर आणि शशांक सिनलकर यांनीच आपल्याकडे 20 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप दुकानदार रमेश त्रिवेदी यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हणजे 23 ऑगस्ट रोजी बदलापूरजवळील अंबरनाथमध्ये वडापावमध्ये मेलेली पाल आढळल्याचा प्रकार समोर आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Dnyanada Kadam : 'एबीपी माझा'च्या मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार; मुंबई मराठी पत्रकार संघाकडून गौरव
'एबीपी माझा'च्या मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार; मुंबई मराठी पत्रकार संघाकडून गौरव
विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर! पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीय,  रोहिणी खडसेंचा टोला
विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर! पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीय,  रोहिणी खडसेंचा टोला
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार

व्हिडीओ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
IPS Transfer : मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
Embed widget