मुंबई : मुंबईच्या नायर रुग्णालयात जगातील सर्वात मोठ्या ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. मेंदूपेक्षा जास्त वजनाचा म्हणजे 1. 873 किलोचा हा ट्यूमर होता.
संतलाल पाल या 31 वर्षीय व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डोकेदुखीमुळे हैराण झाल्याने संतलालने सिटी स्कॅन आणि एमआरआय केला होता. त्यावेळी डोक्यात कवटीच्या हाडांद्वारे मोठी गाठ पसरल्याचं आढळलं. या गाठीमुळे संतलालच्या डोक्यावर जडपणा आणि दृष्टीदोषात वाढून अंधत्व आलं होतं.
नायर हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरीचे प्रमुख डॉ. त्रिमूर्ती डी. नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 14 तारखेला ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रयक्रिया तब्बल सात तास चालली.
या शस्त्रक्रियेद्वारे गाठीचे निर्मूलन करण्यात आलं असून सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. जगातील पहिलीच इतकी मोठी गाठ असलेली ही शस्त्रक्रिया होती.
नायर रुग्णालयात जगातील सर्वात मोठ्या ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Feb 2018 09:56 PM (IST)
नायर हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरीचे प्रमुख डॉ. त्रिमूर्ती डी. नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 14 तारखेला ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -