कल्याण : कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या महिला आरपीएफला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसच सुरक्षित नसतील, तर सामान्यांचं काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.


 
प्रतिभा साळुंखे असं मारहाण झालेल्या महिला आरपीएफचं नाव आहे. साळुंखे कल्याणमधील फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. त्यावेळी फेरीवाले आणि महिला पोलिसात वाद झाला आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. दुर्गा तिवारी आणि सुभम मिश्रा अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं आहेत.

 
दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी जीआरपीमध्ये गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

पाहा व्हिडिओ :