एक्स्प्लोर

लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात घुसून तरुणाचे अश्लील चाळे

काल दुपारी सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी लोकल 2 वा 42 मिनिटांनी सुटली. लोकलने वेग पकडला असता, अचानक मुहिलांच्या कोचमधून एका मुलीचा ओरडण्याचा आवाज आला.

मुंबई: धावत्या लोकलमध्ये अश्लील प्रकार करुन महिलांना त्रास देण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तसे प्रकार अद्याप सुरुच आहेत. अशीच घटना काल पुन्हा सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये घडली. काल दुपारी सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी लोकल 2 वा 42 मिनिटांनी सुटली. लोकलने वेग पकडला असता, अचानक मुहिलांच्या कोचमधून एका मुलीचा ओरडण्याचा आवाज आला.  अन्य प्रवाशांनी तिकडे पाहिलं असता, त्यावेळी महिलांच्या कोचमध्ये एका बाजूला एक मुलगी बसलेली आणि तिच्या बाजूलाच एक मुलगा अश्लील चाळे करताना दिसला. जितेश उतेकर या प्रवशाने तात्काळ त्याला हटकले आणि तिथून जायला सांगितले. त्यावेळी तो मुलगा दरवाज्यात येऊन उभा राहिला. जितेश उतेकर याने त्याचा फोटो काढला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. इतर प्रवासीदेखील ते सर्व बघून ओरडू लगल्याने, त्या मुलाने मस्जिद बंदर स्टेशन येण्यापूर्वीच धावत्या लोकलमधून उडी घेतली आणि पसार झाला. लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात घुसून तरुणाचे अश्लील चाळे आरोपी या सर्व घटनेमुळे मुलीला प्रचंड धक्का बसला. ती प्रचंड रडू लागली. तिच्या मदतीसाठी जितेशने आरपीएफ आणि जीआरपी हेल्पलाईन नंबरला संपर्क केला, पण पोलीस येईपर्यंत वडाळा स्टेशन आले. तिथे त्या मुलीला पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. मात्र मुलगी प्रचंड घबरलेली असल्याने तिने तक्रार दिली नाही. शेवटी ती मुलगी निघून गेली, त्यामुळे जितेशनेच तक्रार द्यायचे ठरवले. वडाळा लोहमार्ग पोलिसांनी त्याला सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडे पाठवले. मात्र तिथेही त्याची तक्रार घेतली नाही. ती मुलगीच तक्रार देऊ शकते, असे सांगून त्याला केवळ तोंडी आश्वासन दिले गेले. शेवटी जितेशने सोशल मीडियाचा आधार घेतला. मात्र अजूनही नेमकी काय कारवाई करण्यात आली, हे गुलदस्त्यात आहे. या सर्व प्रकारामुळे लोकलमध्ये महिला अजूनही सुरक्षित नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. जितेशसारख्यांनी जी भूमिका घेतली, तशी तुम्ही-आम्ही सर्वांनी घेण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Embed widget