मुंबई : नुकताच नवरात्री उत्सव पार पडला आहे. देशभरात दुर्गेची पूजा करण्यात आली. पण सगळ्यांचं रक्षण करणाऱ्या खाकीतल्या दुर्गा मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शौचालयासाठी  मुंबईत (Mumbai) अनेक समस्यांना तोंड देत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून  'वोलू' अॅप वरदान ठरत आहे. काय आहे हे अॅप आणि कशाप्रकारे हे अॅप महिला पोलिसांठी (Police) काम करत आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी अहोरात्र पोलीस रक्षण करत आहेत. त्यातच या पोलीस दलातील कर्मचारी हे निस्वार्थीपणे आपली सेवा बजावतात. यामधील महिला पोलिसांना  प्रवासात आणि नोकरीवरुन  घराबाहेर पडल्यानंतर जर वॉशरूमला जायचं असेल, तर अनेक अडचणी येतात. वॉशरुमच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे एकही ठोस योजना नाही. त्यामुळे महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. सार्वजानिक ठिकाणी असलेल्या वॉशरुमधील असुविधा आणि अस्वच्छता पाहाता महिला अशा ठिकाणी जाण्याच टाळतात.पण यावर एक उत्तम उपाय हा वोलू अॅपने आणला आहे. 


'वोलू' अॅप नेमकं काय आहे? 


प्रवासातील आणि नोकरीवर असणाऱ्या महिलांना दिलासा देणार हे अॅप आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी असणाऱ्या 'वोलू'ने एक अनोखं मोबाइल अॅप लाँच केलं. या अॅपमुळे महिलांना शहरातील सर्वात जवळ असणारे वॉशरुम शोधण्यास मदत होईल. यामुळे शहरातील अनोळखी ठिकाणी गेल्यानंतरही शौचालय शोधत फिरायची गरज भासत नाही. ही सुविधा मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होते. त्यामुळे प्रत्येक भागामध्ये महिला या सहज शौचालयाचा वापर करु शकतात. 


वोलू अॅपची सुविधा  


सध्या हे ॲप 5000 मुंबई पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना मोफत वापरता येईल. 1400 पोलीस कर्मचाऱ्यांनी हा ॲप डाऊनलोड सुद्धा केलाय. भारतातील 400 शहरांमधील 25000 वॉशरूम संदर्भातली माहिती या ॲपवर उपलब्ध आहे. तसेच मुंबईतील   1500 वॉशरुम संदर्भात या अॅपवर माहिती आहे. 2021 मध्ये या अॅपची सुरुवात झाली. त्यानंतर या अॅपवर जवळपास  45 हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्याचा वापर केला. तर येणाऱ्या कालावधीमध्ये या अॅपचा वापर हा कॉर्पोरेट आणि प्रायव्हेट सेक्टरमधील महिलांना देखील होईल. 


मुंबई पोलीस दलामध्ये 5000 महिला पोलीस कार्यरत आहेत. अनेकदा सण उत्सव आणि बंदोबस्तासाठी अनेक ठिकाणी त्यांना त्यांच कर्तव्य पार पाडावं लागतं. त्यामुळे त्यांना शौचालयाला जाण्यासाठी या ॲपच्या माध्यमातून जवळचे शौचालय शोधून काढता येईल.  पोलीस महिलांसाठी हे अॅप  अधिक फायदेशीर ठरत असल्याचं सांगण्यात येतय. घराबाहेर पडल्यानंतर स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयाचा शोध फार कठिण असतं. पण हे अॅप त्यासाठी मदत करतं. सध्या हे अॅप मुंबईपुरतचं मर्यादित आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ही सुविधा देशभरात सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.  


हेही वाचा : 


Pune crime news : ट्रिपल सीट असताना अडवल्याचा राग; आर्मी जवानाने थेट पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक, दगडूशेठ मंदिर परिसरातील थरार