मुंबई : देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करुन उपमुख्यमंत्री बनलेले अजित पवार राष्ट्रवादीत परतले खरे. परंतु, नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही आपल्या समर्थक आमदारांना मंत्रिपदं मिळावीत यासाठी ते आग्रही आहेत. पुणे जिल्ह्यातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांपैकी तिघांना मंत्रिपद मिळावं, अशी मागणी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीरपणे केलीय. त्यामुळं राज्यातील अजित पवार समर्थक कोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळू शकतं याचा घेतलेला हा आढावा.

1. दत्तात्रय भरणे - बारामतीला अगदी लागून असलेल्या इंदापूर मतदारसंघातून भरणेंनी भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटलांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केलाय. राज्यातील धनगर समाजातून निवडून आलेले ते एकवेम आमदार आहेत, असा भरणेंचा दावा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा संवेदनशील मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. हे ध्यानात घेता भरणेंना संधी मिळू शकते.
2. सुनील शेळके - भाजपच्या मावळ या गेल्या पंचवीस वर्षांपासून अभेद्य किल्ल्याला सुनील शेळकेंच्या माध्यमातून उध्वस्त करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी यश आलं. जायंट कीलर ठरलेल्या सुनील शेळकेंचा उपयोग एकुण मावळ लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी आणि शेजारच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी पहिल्यांदाच आमदार बनलेल्या शेळकेंना मंत्रीपद मिळू शकतं. शेळकेंची पार्श्वभूमी ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असणं हे मंत्रीपद मिळण्यासाठी त्यांना अडचणीचं ठरू शकतं. परंतु, अजित दादांशी असलेली एकनिष्ठता त्यांच्या कामी येऊ शकते.
3. धनंजय मुंडे - अजित पवारांनी केलेल्या बंडात सहभागी असलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. प्रश्न आहे तो कोणतं खातं मिळणार याचा. काका गोपीनाथ मुंडे यांचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमधे धनंजय मुंडे आले ते अजित पवारांच्या विश्वासावर.
4. राजेश टोपे - राजेश टोपे यांचे वडील माजी खासदार अंकुशराव टोपे हे शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जात. परंतु, नव्या पिढीत राजेश टोपे यांचे सुर जुळले ते अजित पवारांशी. मराठवाड्यातुन निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोजक्या आमदारांमध्ये राजेश टोपे यांचा समावेश असल्यानं त्यांचा नंबर लागू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कॅबिनेट आणि राज्य अशी मिळून 16 मंत्रीपद आलीयत. ती कोणाला मिळू शकतात पाहूयात.

  • 1. जयंत पाटील - प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रीपदाचा अनुभव. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून किल्ला लढवणारे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया आणखी विस्तारण्यास मदत होऊ शकते.
    2. छगन भुजबळ - शरद पवारांचे विश्वासू आणि अनुभवाने ज्येष्ठ. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात गेलेल्या छगन भुजबळांनी मंत्रीपद नक्की झाल्यावर शरद पवारांनी आपला राजकीय पुनर्जन्म केल्याची भावना बोलून दाखवली होती. भुजबळांच्या माध्यमातून ओबीसींना पक्षाकडे वळवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पुन्हा एकदा प्रयत्न असेल.
    3. दिलीप वळसे-पाटील - शरद पवारांचे विश्वासू आणि अनुभवी. मंत्रीपदाचा आणि विधानसभेचे उपाध्यक्ष पद सांभाळण्याचा ही अनुभव.
    4. अनिल देशमुख - राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील प्रमुख नेते. मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील देशमुख पवारांशी एकनिष्ठ राहिले. अनिल देशमुखांच्या माध्यमातून पक्षाचा विदर्भात पाया विस्तारण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल.
    5. हसन मुश्रीफ - कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा पडत्या काळात सांभाळणारे. अल्पसंख्याक समाजातील नेते. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आवर घालण्यासाठी मुश्रीफांचा उपयोग करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल.
    6. नवाब मलिक - पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडणारे नवाब मलिक अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही काळात पुढे आणलेत. मुंबईमधे राष्ट्रवादी काँग्रेसची मर्यादित ताकद नवाब मलिक यांच्या माध्यमातून वाढवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल.
    7. बबन शिंदे - एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोजक्या आमदारांपैकी एक. भाजपमध्ये गेलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना शह देण्यासाठी बबन शिंदेंना मंत्रीपद मिळू शकते. शिंदेंच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून पक्ष सोडून गेलेल्या जिल्ह्यातील नेत्यांची पुन्हा मोट बांधण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल.

  • 8. जितेंद्र आव्हाड - पक्षाची पुरोगामित्वाची भुमिका आक्रमकपणे मांडणारे आव्हाड शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वांना परिचित आहेत. आव्हाडांच्या माध्यमातून ओबीसींना स्वतःकडे वळवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल. अजित पवारांनी केलेल्या बंडाच्या काळात आव्हाडांनी सोडून गेलेल्या आमदारांना परत आणण्यात महत्वाची भुमिका निभावली होती.
    9. बाळासाहेब पाटील - बाळासाहेब पाटील यांना मंत्रीपद मिळणार हे खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केलंय. ते देखील अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे अनिश्चिततेचं वातावरण असताना. यावरुन शरद पवारांचा त्यांच्यावर असलेला विश्वास अधोरेखित होतो. उदयनराजे भोसले यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णय घेतल्यानंतर सातारचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात बाळासाहेब पाटील यांची महत्त्वाची भूमिका राहिली. श्रीनिवास पाटील यांना बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 52 हजारांची मताधिक्य मिळवून दिलं जे निर्णायक ठरलं. त्याचं बक्षीस बाळासाहेब पाटील यांना मंत्रीपदाच्या स्वरुपात मिळणार आहे.
    10. धर्मराव बाबा अत्राम - पक्षाचे जुने नेते. आघाडी सरकारच्या काळात हरणाच्या शिकार प्रकरणात धर्मरावबाबांना मंत्रीपद गमवावं लागलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. परंतु, यावेळी भाजपचे मंत्री अंबरीश अत्राम यांचा पराभव करुन धर्मरावबाबा अत्राम पुन्हा एकदा निवडून आलेत. पुर्व विदर्भात पक्षाचा पाया विस्तारण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न असेल.
    11. सरोज अहिरे - महिलांना मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा सरोज अहिरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल. उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी आणि तरुण चेहरा मंत्रीपदी बसवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल.
    12. इंद्रनील नाईक - मागील निवडणुकीत विदर्भातुन मनोहर नाईकांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार निवडून आला होता. यावेळी प्रकर्षाने त्यांचा मुलगा इंद्रनील नाईकला उमेदवारी दिली. नाईक कुटुंबाची पवारांशी असलेली जवळीक पाहाता आणि विदर्भातील पक्षाच्या वाढीचा विचार करता त्यांना संधी मिळू शकते.
    13. दत्तात्रय भरणे किंवा

  • 14 सुनील शेळके
    15. धनंजय मुंडे
    16. राजेश टोपे


वाचा - जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवड अन् चार प्रभाग पद्धत रद्द होणार?

AJIT PAWAR | नागपूर अधिवेशनात अजित पवारांचा नवा लूक, सुटाबुटात एन्ट्री | ABP MAJHA