एक्स्प्लोर

ओला-उबेरची मक्तेदारी खपवून घेणार नाही : राज्य सरकार

मोबाईल अॅपवर चालणाऱ्या राष्ट्रीय परवानाधारक टॅक्सी चालक आणि मालकांना स्थानिक परवाना मिळवण्यासाठी काली-पिवळी टॅक्सी चालकांच्या तुलनेत 10 पट पैसे मोजावे लागतील.

मुंबई : मोबाईल अॅपवर आधारीत टॅक्सीमध्ये ओला उबेरची मक्तेदारी आणि मनमानी कारभार खपवून घेणार नाही. काली-पिवळी टॅक्सींचं अस्तित्त्व संपवण्यासाठी अॅपवर आधारीत टॅक्सी कंपन्या वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटिजी वापरत आहेत. मात्र समाजाच्या हितासाठी लवकरच ओला आणि उबेरसारख्या टॅक्सींवर लगाम लावणार असल्याचं सरकारी वकील जी. डब्ल्यू. मॅटोस यांनी हायकोर्टात म्हटलं. शहरी भागांत प्रवाशांची ने-आण करणाऱ्या सर्व टॅक्सी चालकांकडे वैध परवाना असणं बंधनकारक असेल. त्याचबरोबर प्रवाशांकडून भाडं वसूल करताना ते प्रमाणित टॅक्सी मीटरद्वारे असणं बंधनकारक आहे. त्यामुळे ओला उबेरकडून गर्दीच्यावेळी एक आणि इतर वेळ एक अशाप्रकारे प्रवाशांकडून होणारी भाडेवसुली गैर असून त्यावर लवकरच राज्य सरकारकडून नियंत्रण आणलं जाईल असही सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या नियमावलीला आव्हान देण्याऱ्या अॅपधारक टॅक्सी चालकांना त्यांच्यावर कुणाचच बंधन नकोय. मात्र ते शक्य नाही. ओला उबेरसारख्या टॅक्सी या मोबईल अॅपवर जरी आधारीत असल्या तरी त्या राज्य परिवहन विभागाच्याच अखत्यारीत आहेत, असंही राज्य सरकारनं आपल्या उत्तरात स्पष्ट केलंय. अॅपद्वारे इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग नश्चित करून त्याद्वारे ओला उबेर भाडं वसूल करत असल्यानं त्यावर सध्या सरकारचं नियंत्रण नाही. मात्र याचकरता भाडे निश्चिती समिती स्थापन करण्यात आली असून 21 नोव्हेंबरपर्यंत या समितीचा अंतिम अहवाल सादर केला जाईल. ज्यानुसार राज्य सरकार नवी नियमावली लागू करेल असं एमएमआरडीएतर्फे सराकारी वकील जी. डब्ल्यू. मॅटोस यांनी हायकोर्टाला सांगितलं आहे. राष्ट्रीय परवानाधारक टॅक्सी चालकांना मुंबई शहर प्राधिकरणाच्या विभागात स्थानिक परवान्याशिवाय टॅक्सी चालवण्यास मनाई करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अली रझ्झाक हुसैन आणि इतर पाच अॅपधारक टॅक्सी चालकांनी  हायकोर्टात याचिका दाखल केलीय. मोबाईल अॅपवर चालणाऱ्या राष्ट्रीय परवानाधारक टॅक्सी चालक आणि मालकांना स्थानिक परवाना मिळवण्यासाठी काली-पिवळी टॅक्सी चालकांच्या तुलनेत 10 पट पैसे मोजावे लागतील.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Embed widget