एक्स्प्लोर

Mumbai Metro : मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा काढण्यात येणार?

Mumbai Metro : मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या जागी खाजगी सुरक्षा रक्षक पुरवल्या जाणार आहेत.

मुंबई : संवेदनशील ठिकाणे, आस्थापने यांच्या सुरक्षेचा भार पोलिस यंत्रणेवर पडत असल्याने मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन करून त्याअंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची निर्मिती केली. त्यानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बल रक्षक सुरक्षा देतात, त्यामध्ये मुंबई मेट्रोमध्ये देखील गेल्या काही वर्षापासून सुरक्षा देत होते. मात्र अचानक आता मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या जागी खाजगी सुरक्षा रक्षक पुरवल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र सुरक्षा बाळातील एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याचा शर्तीवर माहिती दिली की, मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा बळाची सुरक्षा आता काढण्यात येणार आहे. त्या जागी खाजगी सुरक्षा रक्षक ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. 5 जूननंतर एमएमआरडीए मेट्रोमधून ही सुरक्षा काढणार आहे. त्यामुळे खासगी सुरक्षारक्षकांकडे आता मुंबईकरांची सुरक्षा जाणार आहे.

एमएमआरडीएने महाराष्ट्र सुरक्षा बळाला तसं पत्र दिले

आर्थिक कारण देत ही सुरक्षा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन करून त्याअंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची निर्मिती केली. त्यानुसार अनेक ठिकाणी ही सुरक्षा पुरविली जाते, मात्र आता मुंबई-मेट्रो मधून ही सुरक्षा काढली जाणार आहे अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

यासंदर्भात  आम्ही महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या प्रमुखांना  आणि एम एम आर डी ए अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यासाठी नकार दिलाय. त्यामुळे मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा का ? काढून घेण्यात येतेय यासंदर्भात नक्की कारण कळलेलं नाही. त्यामुळे पुढील काळात जर मुंबई मेट्रोमध्ये खाजगी सुरक्षारक्षकांना मार्फत सुरक्षा दिली जाणार असेल, तर ते यामागचं लॉजिक काय असा प्रश्न देखील उपस्थित होतो.

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
Maharashtra Live News Updates: पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
Mumbai Rain Updates: मुंबईसाठी पुढील 2 ते 3 तास महत्वाचे, हवामान विभागाची महत्वाची माहिती; कोकणातही पावसाचा जोर वाढला!
मुंबईसाठी पुढील 2 ते 3 तास महत्वाचे, हवामान विभागाची महत्वाची माहिती; कोकणातही पावसाचा जोर वाढला!
Raj Thackeray: ठाकरे गट फुटला, राज ठाकरे सावध, मनसेच्या नगरसेवकांना तातडीने शिवतीर्थवर बोलावलं, नेमकं काय घडलं?
ठाकरे गट फुटला, राज ठाकरे सावध, मनसेच्या नगरसेवकांना तातडीने शिवतीर्थवर बोलावलं, नेमकं काय घडलं?
Balasaheb Thackeray and Kiran Pawaskar Shivsena: किरण पावसकरांचं 'ते' वाक्य बुमरँग , बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवल्याचा आरोप; शिंदे गटात खासदारांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात काय घडलं?
किरण पावसकरांचं 'ते' वाक्य बुमरँग , बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवल्याचा आरोप; शिंदे गटात खासदारांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde Akola: टीप मिळाली अन् मध्यरात्रीच्या सुमारास तुकाराम मुंढेंच्या पथकाची मोठी कारवाई; लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
टीप मिळाली अन् मध्यरात्रीच्या सुमारास तुकाराम मुंढेंच्या पथकाची मोठी कारवाई; लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
Gokul Gite: भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर...; गोकुळ गीतेंचा शिंदे-सामंतांसमोरच मोठा शब्द, नेमकं काय-काय म्हणाले?
भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर...; गोकुळ गीतेंचा शिंदे-सामंतांसमोरच मोठा शब्द, नेमकं काय-काय म्हणाले?
Sanjay Dina Patil Operation Tiger: शिंदे गटात जाताच संजय दिना पाटील आक्रमक; बंदुकीची ॲक्शन करत म्हणाले, माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात
संजय दिना पाटील आक्रमक; बंदुकीची ॲक्शन करत म्हणाले, माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात
MNS Girgaon Chowpatty :
"मंगलप्रभात लोढांना गिरगावात मांसाहार बंद करायचा आहे"; कोळी बांधवांसाठी मनसे मैदानात, महापालिकेकडे केली मोठी मागणी
Sanjay Dina Patil Opration Tiger Uddhav Thackeray: केंद्र सरकारचा तो एक प्लॅन आणि एकनाथ शिंदेंचं आश्वासन; संजय दिना पाटील शिंदेंसोबत जाण्यास तयार कसे झाले?, Inside Story!
केंद्राचा तो एक प्लॅन आणि एकनाथ शिंदेंचं आश्वासन; संजय दिना पाटील शिंदेंसोबत जाण्यास तयार कसे झाले?, Inside Story!
Balasaheb Thackeray and Kiran Pawaskar Shivsena: किरण पावसकरांचं 'ते' वाक्य बुमरँग , बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवल्याचा आरोप; शिंदे गटात खासदारांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात काय घडलं?
किरण पावसकरांचं 'ते' वाक्य बुमरँग , बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवल्याचा आरोप; शिंदे गटात खासदारांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात काय घडलं?
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
Eknath Shinde On Omraje Nimbalkar: वडिलांच्या मृत्यूबाबत विरोधात निकाल; लगेच एकनाथ शिंदेंनी ओमराजे निंबाळकरांना फोन फिरवला, एकच शब्द दिला!
वडिलांच्या मृत्यूबाबत विरोधात निकाल; लगेच एकनाथ शिंदेंनी ओमराजेंना फोन फिरवला, एकच शब्द दिला!
Embed widget