एक्स्प्लोर

मित्राच्या मदतीने पत्नीकडून पतीवर उकळतं तेल टाकत जीवघेणा हल्ला

जखमी भविष्यनं जीव वाचवण्यासाठी प्रेशर कुकर आणि स्पीकर हे किचनच्या खिडकीतून बाहेर फेकल्यावर आजूबाजूचे रहिवाशी त्याच्या रुममध्ये पोहचले आणि त्यांनी पोलिसांना बोलावून घेतलं.

वसई : मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वसई पश्चिममध्ये घडली आहे. पतीचे पाय बांधून, अंगावर उकळतं तेल टाकत, डोळ्यात मिरची पूड, डोक्यावर हातोडीने वार करून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे. तर पतीला मुंईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. भविष्य भु-हागोहा असं जखमी पतीचं नाव असून क्विन्सीया भु-हागोहाय असं पत्नीचं नाव आहे. वसई पश्चिमच्या उमेळमान परिसरातील प्रतापगड या इमारतीत ही घटना घडली आहे. कौटुंबिक भांडणातून क्विन्सीयानं आपल्या पतीला मारहाण करताना उकलतं तेल त्याच्या अंगावर आणि डोळ्यात फेकलं. तसेच हातोडीने डोक्यावर प्रहार केले. घरात मिळेल त्या सामानाने त्याला मारहाण केली. त्याचे पाय रस्सीने बांधून त्याला टॉयलेटमध्ये ठेवलं होतं. जखमी भविष्यनं जीव वाचवण्यासाठी प्रेशर कुकर आणि स्पीकर हे किचनच्या खिडकीतून बाहेर फेकल्यावर आजूबाजूचे रहिवाशी त्याच्या रुममध्ये पोहचले आणि त्यांनी पोलिसांना बोलावून घेतलं.  ही सर्व मारहाण होत असताना त्यांची दोन लहान जुळी मुलंही घरी होती. या प्रकरणी पत्नी क्विन्सीया भु-हागोहाय आणि तिचा मित्र सतवीर नायक याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पतीने केलेल्या आरोपानुसार पत्नी आणि तिच्या प्रियकराने हे कृत्य केलं आहे. तर पत्नीने पोलिसांना सतवीर हा पतीचा मित्र असल्याचं सांगितलं आहे. घटनास्थळी सतवीर उपस्थित होता. त्यामुळं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. क्विन्सीयाच्या आईवडीलांनी भविष्य हा आपल्या मुलीला मारहाण करत असल्याच सांगितलं आहे. क्विन्सीया ही ख्रिश्चन तर भविष्य हा आसामचा मुळचा रहिवाशी होता. या दोघांनीही आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. भविष्य हा मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. ते वसईच्या उमेलमान परिसरातील प्रतापगड या सोसायटीमध्ये भाड्यानं राहात होते. त्यांना दोन लहान जुळी मुलं ही आहेत. भविष्यला पोलिसांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर क्विन्सीया आणि सतवीर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Embed widget